ETV Bharat / state

Heavy Rain In Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी; इरई धरणाचे तीन दारवाजे उघडले

author img

By

Published : Jul 12, 2022, 10:15 PM IST

Updated : Jul 13, 2022, 6:56 AM IST

मागील 48 तासांत चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस ( Continuous rain in Chandrapur district ) सुरू आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले असून अनेक गावांचा संपर्क ( Many villages were cut off due to rains ) तुटला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, जिवती या तीन तालुक्यात अतिवृष्टी ( Excessive rainfall in three Tahsil ) झाली आहे.

इरई धरणाचे तीन दारवाजे
इरई धरणाचे तीन दारवाजे

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 48 तासांत संततधार पाऊस ( Continuous rain in Chandrapur district ) सुरू आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले असून अनेक गावांचा ( Many villages were cut off due to rains ) संपर्क तुटला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, जिवती या तीन तालुक्यात ( Excessive rainfall in three Tahsil ) अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात सरासरी 48 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, इरई धरणाची तीन दारवाजे उघडण्यात आली आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात एक शेतकरी नाल्यात वाहून गेला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील काही मध्यम तसेच लघुसिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, इरई धऱणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेनेही शहरातील नदीकाठावरील नागरिकांना सावधिगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.

बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक 110 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिवती तालुक्यात 86.8 मि.मी. तर, राजुरा तालुक्यात 81.2 मी. मी. पाऊस पडला आहे. सर्वात कमी पाऊस ब्रह्मपुरी तालुक्यात २५.६ मि. मी.पावसाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरीत तालुक्यातील बेटाळा येथील नवलाजी पांडुरंग तुपट (वय ५६) हे भुतीनाल्यात वाहून गेले. ही घटना रविवारला दुपारी दोन वाजताच्या सुमाराला घडली. तुपट शेतात जाण्यासाठी नाला ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते वाहून गेले. त्यांचा मृतदेह आज सापडला आहे.

नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक मार्ग बंद - तसेच सावली तालुक्यातील नवेगाव येथील पुरुषोत्तम डोमाजी वसाके यांच्या घराची भिंत रविवारला रात्री नऊ वाजताच्या सुमाराला कोसळली. त्यावेळीत त्यांचे कुटुंबीय घरातच होते. भिंत विरुद्ध दिशेने पडल्यामुळे ते बचावले. सावली तालुक्यात एक जूनपासून आतापर्यंत २७ घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. कोरपना तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहे. चन्नई-कन्हाळगाव, कोरपना-आदिलाबाद, जांभुळधरा-मांडवा, राजुरा-अमृतगुडा, राजुरा-धिडशी, गडचांदूर-टेकमांडवा, वरोरा-शेगाव, तोहगाव-लाठी हे मार्ग बंद झाले आहेत.

हेही वाचा - Maharashtra weather forecast: कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

तब्बल तीन तास वाहतूक ठप्प - धानोली तांडा क्रमांक दोन येथील दहा ते बारा घरात नाल्याचे पाणी शिरल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे घरातील अन्नधान्य,साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप प्रशासनाकडून मदत मिळाली नाही. सर्वाधिक पाऊस कोसळणाऱ्या बल्लारपूर तालुक्यात पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. राजुरा नगरपरिषदेच्या कारभाराचे पावसाने धिंडवडे काढले. राजुऱ्यातील फिरोज शहा-ले आऊट मधील नाली कोसळल्याने अनेक प्रभागांत पाणी साचले होते. सिंधी गावलागतच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. तसेच खांबाला नाल्यावरुन पाणी ओसंडून वाहत आहे. धानोरा पुलावरील वाहतूक पाणी वाढल्याने बंद केली आहे. शिरपूर-अमृतगुडा, शेगाव-वरोरा , जिवती-येल्लापूर मार्ग बंद झाले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील नागाळा जवळ मोठे झाड कोसळल्याने जवळपास तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तासापर्यंत या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. नदीकाठावरील शेत खरडवून निघाली आहे. हजारो हेक्टर शेतात गुडघाभर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले आहे.



इरईचे दरवाजे उघडले - इरई धरणाचे एक, चार आणि सात क्रमांकाचा दरवाजा २५ से.मी.ने उघडले आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी शेतात लागणारी अवजार तसेच जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पदमापूर, किटाळी, मसाळा, यशवंतनगर, पडोली, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोली, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बू, आंबोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवठी, चेकतिरवंजा, देवाडा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मीनगाव, वडगाव, चंद्रपूर मधील नागरिकांनी गुरे, मालमत्ता नदीकाठापासून दूर ठेवावी अन्यथा होणाऱ्या नुकसानास वीज कंपनी जबाबदार राहणार नसल्याचे मुख्य अभियंत्यांनी कळविले आहे.




चंद्रपुरात हाय अलर्ट - इरई धरणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे इरई नदील लगतचा वडगाव वॉर्ड, हवेली गार्डन, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, रहेमत नगर, झरपट नदी लगतच्या भंगाराम , सोनारी मोहल्ला, काजीपुरा वसाहत या परिसरातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केले आहे. मनपा प्रशासनाने भोजन, निवासाची व्यवस्था करुन ठेवलेली आहे. पाणी वस्त्यांत घुसले तर लोकांनी त्वरित मदत पोहोचविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे आयुक्त राजेश मोहीते यांनी सांगितले. ध्वनिक्षेपकावरुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.


सिंचन प्रकल्प फुल्ल - चंद्रपूर जिल्हयातील मध्यम, लघु सिंचन प्रकल्पातील काही शंभर टक्के भरले आहे. नलेश्वर , चंदई, चारगाव, लभानसराड प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. आसोलामेंढा (६९.०८ टक्के), घोडाझरी (४६.३२ टक्के), अमलनाला (५५.५३ टक्के), पकडीगुड्डम (७७.८). डोंगरगाव (९७.५८) आणि इरई धरण (७१.३५) टक्के भरले.

हेही वाचा - Breaking News : स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले

Last Updated : Jul 13, 2022, 6:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.