ETV Bharat / state

Poisoning To Students From Chicken : सहलीत चिकन खाल्ले; जिल्हा परिषद शाळेतील अकरा मुलांना विषबाधा

author img

By

Published : Jan 21, 2023, 4:51 PM IST

शाळेची सहल गेली असता विद्यार्थ्यांना चिकन खाऊ घालण्यात आले. यातून 11 जणांना विषबाधा झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात घडली. या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालय गाठले.

Poisoning To Students From Chicken
उपचार घेत असलेले विद्यार्थी

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक बोरगाव परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल शाळेतील शिक्षकांनी वडोली मार्गावर असलेल्या इको पार्कमध्ये नेली. सहलीत 52 विद्यार्थी होते. पार्कमध्ये विद्यार्थ्यांना बायलर चिकन खाऊ घातल्या गेले. यामुळे अकरा विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालय गाठले. विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जात असताना याची माहिती पालकांना देणे गरजेचे होत. मात्र, शिक्षकांनी लोकांना माहिती दिल्या नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

शाकाहारी ऐवजी मांसाहारी भोजन : मुलांनी जेवण केले आणि त्यानंतर ते गोल फिरणाऱ्या चकरीवर बसले. त्यामुळे त्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या. मुलांची प्रकृती आता बरी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक पेंदोर यांनी दिली. निसर्गरम्य ठिकाणावर शिक्षकांनी सहल नेली. तिथे शाकाहारी अन्न विद्यार्थ्यांना खाऊ घालायला हवे होते. मात्र, शिक्षकांनी चक्क चिकन आणले. मुख्याध्यापकांना विचारणा केली असता ते म्हणाले की, विद्यार्थ्यांची चिकन खाण्याची इच्छा होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू रुग्णालयात पोहचले. पुढील तपास सुरू आहे.


रुग्णालयातील विद्यार्थ्यांची नावे : समीरा वेलादी, संस्कार झाडे, रवली शेंडे, आरती आत्राम, टिना बोरकुटे, खुशाल बोरकुटे, भारत झाडे, रुद्रमनी वेलादी, क्रिश वेलादी, आदित्य वेलादी या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : Clash Of Women : करवसुली स्टॉलवर महिलांची तुफान हाणामारी ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.