ETV Bharat / state

District Sport Complex Charges : धावपट्टीवर चालायचे आहे तर पैसे मोजा; क्रीडा संकुलाच्या निर्णायामुळे जनता संतप्त

author img

By

Published : Dec 28, 2022, 12:39 PM IST

चंद्रपूर जिल्हा क्रीडासंकुलात नुकतेच धावपट्टीचे लोकार्पण करण्यात ( Chandrapur District Sports Complex Runing Track ) आले. मात्र त्यात आता तीनशे ते पाचशे रुपये महिना प्रवेश शुल्क आकारणी करण्यात येणार ( Three To Five Hundred Monthly Charges ) आहे. त्याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. प्रवेश शुल्क आकारणी मागे घेण्याची मागणी जन विकास सेनेकडून होत (citizens Demand To Withdraw All Charges ) आहे. त्याबाबतचे पत्रक क्रीडासंकूलाला देण्यात आले आहे.

District Sport Complex Charges
क्रीडा संकुलाच्या निर्णायामुळे जनता संतप्त

क्रीडा संकुलाच्या निर्णायामुळे जनता संतप्त

चंद्रपूर : जिल्हा क्रीडासंकुलातील धावपट्टीचे लोकार्पण नुकतेच करण्यात ( Chandrapur District Sports Complex Running Track ) आले. अत्याधूनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या धावपट्टीमुळे खेळाडू, पोलीस-सौनिक भरतीसाठी तयारी करणारे तरुण आणि सामान्य नागरिकांत आनंदाचे वातावरण होते. मात्र या आनंदात आता विरजण पडले आहे. कारण या धावपट्टीचा वापर करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने शुल्क आकारण्याचे ठरवले आहे. महिन्याकाठी तीनशे ते पाचशे रुपये मोजावे लागणार ( Three To Five Hundred Monthly Charges ) आहेत. तसा फलक लावण्यात आल्याने वादंग निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

तीनशे ते पाचशे रुपये शुल्क आकारणी : जिल्हा क्रीडा संकुलात सामान्य नागरिकांना प्रवेशासाठी प्रतिमहिना पाचशे, तर खेळाडूंकरिता तीनशे रुपये प्रतिमहिना आणि दोनशे रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. यासंदर्भात आज २७ डिसेंबर रोजी क्रीडासंकुलाच्या परिसरात फलक लावण्यात आले. त्यामुळे पोलिस भरतीचा सराव करणारे शेकडो तरुण-तरुणी चिंतेत सापडले ( citizens Demand To Withdraw All Charges ) आहे.

शहरातील सर्वात मोठे जिल्हा क्रीडासंकूल : प्रदूषणग्रस्त चंद्रपूर शहरातील सर्वात मोठे जिल्हा क्रीडासंकूल ( District Sports Complex for running track )आहे. मनपाने शहरातील बहुतांश मोकळ्या भूखंडावर समाजमंदिर आणि बागा उभ्या केल्या. त्यामुळे नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी आणि खेळाडूंना सरावासाठी शहरात जागा उपलब्ध नाही. कोरोनामुळे रखडलेली पोलिस भरती दोन वर्षानंतर होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी शारिरीक सरावासाठी जिल्हा क्रीडा संकुलात येतात. यातील बहुतांश तरुण-तरुणी सकाळी- सायंकाळी या जिल्हा क्रीडासंकुलात सरावासाठी येतात. यातील काहीजण आधी तुकूम परिसरातील पोलिस फुटबाल ग्राऊंडवर सराव करायचे. मात्र, तो आता बंद केला आहे. त्यामुळे सध्या जिल्हा क्रीडासंकुलात चांगलीच गर्दी बघायला मिळत आहे. मात्र येथे येणाऱ्यांसाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील फलक लावण्यात आले आहे.

प्रवेश शुल्क आकारणी मागे घेण्याची मागणी : यासंदर्भात जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडाअधिकारी अविनाश पुंड यांची भेट घेतली. प्रवेश शुल्क तातडीने मागे घेण्याची मागणी केलेली ( Demand Withdraw All Charges ) आहे. जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत. जिल्हा क्री संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पैस नसेल, तर अनेक पर्याय उपलब्ध आहे. खनिज विकास निधी किंवा उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून हा निधी उभा होवू शकतो, असा पर्याय जनविकास सेनेने दिला ( Jan Vikas Sena ) आहे.

पैसे मोजवेच लागेल? : जिल्हा क्रीडा संकुलातील धावपट्टीची देखभाल दुरुस्तीची कुठलीही तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज ना उद्या यावर आर्थिक शुल्क लादल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सूचनांवर विचार केला जाईल : हा निर्णय जिल्हा क्रीडा संकुल समितीने घेतला आहे. तसेच जनतेच्या सूचना आणि आक्षेपारनुसार पुढील निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी दिली आहे.


एका पक्षाला कंत्राट देण्याचा घाट : जिल्हा क्रीडासंकुलाच्या खासगीकरणाचा घाट रचण्यात आला ( District Sports Complex Privatization Planing ) आहे. देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेच्या नावाखाली एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कंत्राट देण्याचे कटकारस्थान रचण्यात आले आहे असा आरोप जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.