ETV Bharat / state

Fadnavis visit to Chimur : त्वरित पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; चिमूर येथील पुराचा घेतला आढावा

author img

By

Published : Jul 20, 2022, 10:55 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्याला याचा सर्वाधिक पुराचा फटका ( Chandrapur Flood Situation ) बसला आहे. त्यामुळे याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) चिमूर दौऱ्यावर येणार होते. यावेळी त्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

Fadnavis visit to Chimur
फडणवीस यांचा चिमूर दौरा

चंद्रपूर : पुरजन्य परिस्थितीमुळे ( Chandrapur Flood Situation ) मोठी जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. याबाबत त्वरित पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे, यावर तत्काळ निर्णय घेऊन मदत केली जाणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी दिले. आज ते चिमूर येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी हे प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे होते.

हेही वाचा - OBC Reservation : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय

फडणवीस चिमूर दौऱ्यावर - चिमूर तालुक्याला याचा सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूर दौऱ्यावर येणार होते. भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांचा हा मतदारसंघ आहे. सध्या पूर ओसरला असला तरी याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या भागाची पाहणी केली. याबाबत लवकरच निर्णय घेऊन पूरपीडितांना मदत केली जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

जिल्ह्यातील पूरस्थिती ( MH Chandrapur Flood Situation) पूर्ववत होत असतानाच मागील चोवीस तासात मुसळधार पावसाची (Heavy Rains) नोंद झाल्याने, पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील मूल, सावली येथे अतिवृष्टी झाली, त्याचा मोठा फटका चिमूर तालुक्याला बसला आहे. चिमूर शहरासह तालुक्यातील अनेक गावाला पुराने वेढले असून बचाव कार्य सुरू आहे. सध्या तालुक्यातील स्थिती सामान्य होत असली तरी पुढील चोवीस तास धोक्याचे असणार आहे. इरई धरणाचे (Erai Dam) सातही दारं दीड मीटरने उघडण्यात आले आहे. तसेच निम्न वर्धा आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सोबत नजीकच्या तेलंगणा राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जर पुढील चोवीस तासांत मुसळधार पाऊस कोसळला तर याचा मोठा फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसणार आहे.

नद्यांनी गाठली धोक्याची पातळी : जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. वर्धा- वैनगंगा- उमा नद्यांनी पातळी ओलांडली आहे. शहरालगतचे इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे दीड मिटरने उघडले आहे. यामुळे इरई नदीची पाणीपातळी वाढून शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुराचे ताजे संकट चिमूर शहरातुन पुढे आले आहे. संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. टेलिफोन एक्सचेंज, तहसील कार्यालय, माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. 41 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

अनेक मार्ग बंद : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आता हे पाणी ओसरले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली, घूघुस-गडचांदूर येथे पुलाचे पाणी ओसरले असले तरी, तूर्तास हे पूल बंद ठेवण्यात आले आहे. याची पाहणी केल्यावर हे पूल सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, हिंगणघाट तालुक्यात वर्धा अतिवृष्टीहोऊन मोठं नुकसान झाले आहे. अनेकांनाच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतरित करण्यात आले. याच महाकाली नगर भागात पूरपरिस्थितीची पाहणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट ( Hinganghat Taluka ) दौरा केला. तसेच हिंगणघाट येथील मोहता शाळेत स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांशी त्यांनी जमिनीवर बसून संवाद साधला त्यांच दुःख त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार रामदास तडस, आमदर समीर कुणावर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी आमदार राजू तिमांडे, यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde : 'ओबीसी जनतेसाठी मोठा दिलासा, राज्यात ओबीसी आरक्षणासहित निवडणूक '

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.