ETV Bharat / state

'ओबीसींची जातनिहाय जनगणना करा'

author img

By

Published : Feb 6, 2020, 7:50 AM IST

कोळसा खाणीत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या देण्यात याव्या. शहरात एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाला परवानगी देण्यात यावी. जिल्ह्यात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. मुंबई ते चंद्रपूर आणि पुणे थेट रेल्वे सुरू करण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी आपल्या निवेदनात केल्या आहेत.

MP balu dhanorkar meets pm narendra modi
खासदार बाळु धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

चंद्रपूर - इतर मागासवर्गीय वर्गाची (ओबीसी) स्वतंत्र जनगणना होत नसल्याने समाजाला योग्य ते लाभ मिळू शकत नाहीत. 2021 मध्ये राष्ट्रीय जनगणना होणार आहे. म्हणून यात यामध्ये ओबीसींसाठी स्वंतत्र कॉलम असावा, अशी मागणी खासदार बाळु धानोरकर यांनी केली आहे. धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूर मतदारसंघातील अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. तसेच त्यासंबधीचे निवेदन पंतप्रधान मोदी यांना दिले. काँग्रेसचे खासदार धानोरकर हे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

पूर्व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भद्रावती तालुक्यात ३००० एकर जमीन ऊर्जाप्रकल्पासाठी मंजूर केली. मात्र, अजुनही तिथे कोणताही उद्योग सुरू होऊ शकला नाही. याठिकाणी एखाद्या उद्योगास मान्यता मिळावी. तसेच कोळसा खाणीत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या देण्यात याव्या. शहरात एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाला परवानगी देण्यात यावी. जिल्ह्यात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. मुंबई ते चंद्रपूर आणि पुणे थेट रेल्वे सुरू करण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी आपल्या निवेदनात केल्या आहेत.

याचबरोबर चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. मात्र, येथील प्रस्तावित विमानतळ राजुरा येथे आहे. राजुरा शहर दुसऱ्या टोकाला असल्याने हे विमानतळ भद्रावती येथे बनवण्यात यावे. चंद्रपूरच्या दिक्षाभूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक बौद्ध बांधवांची आस्था या ठिकाणी जुळलेली आहे. यामुळे दिक्षाभूमीचा विकास करण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करुन द्यावा. कर्नाटक एम्टा ही खाण पुन्हा सुरू करण्यात यावी. यासोबतच जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान, गोंडकालीन किल्ले आहेत. जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने या सर्वांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी द्यावा, अशी मागण्या धानोरकर यांनी या भेटी दरम्यान केल्या आहेत.

हेही वाचा - 'शिवसेना शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करणार'

Intro:

चंद्रपूर : चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळु धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चंद्रपुर मतदार संघातील अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा केली तसेच त्यासंबधीचे निवेदन पंतप्रधान मोदी यांना यावेळी दिले.


२०२१ मधे राष्ट्रिय जनगणना होणार आहे, यामधे ओबीसी साठी स्वतंत्र काॅलम असावा, ओबीसी ची स्वतंत्र जनगणणा होत नसल्याने समाजाला योग्य ते लाभ मिळु शकत नाही आहे, अनेक लोकांनी त्या विरुद्ध आंदोलनात्मक पावित्रा घेतलाय. त्यामुळे ओबीसी बांधवांसाठी स्वतंत्र काॅलम जनगनणेत असावा अशी मागणी धानोरकर यांनी पंतप्रधानांना भेटुन केली.
यावेळी धानोरकर यांनी कर्नाटक एम्टा ही खाण पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी केली. पूूर्वया पंंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी भद्रावती तालुक्यात ३००० एकर जमीन पावर प्लँट साठी मंजुर केली परंतु अजुनही तिथे कोणताही उद्योग सुरु होऊ शकला नाही. तिथे एखाद्या उद्दोगास मान्यता मिळावी, ज्या शेतकर्यांच्या जमीनी कोळसा खाणीत गेल्या त्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नौकर्या देण्यात याव्या. चंद्रपुरात एक मल्टिस्पेशालीटी रुग्णालयाला परवानगी देणयात यावी, जिल्ह्यात रखडलेले सिंचन प्रकल्पाना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, मुंबई ते चंद्रपुर आणि पुणे थेट ट्रेन सुरु करण्यात यावी, चंद्रपूर औद्योगीक शहर आहे पण येथील प्रस्तावीत विमानतळ राजुरा येथे आहे. परंतु हे विमानतळ भद्रावती येथे बनवण्यात यावे कारण राजुरा शहर जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला आहे. त्यामुळे विमानतळ भद्रावतीला स्थानांतरीत करण्यात यावे, चंद्रपुरच्या दिक्षाभुमीला ऐतिहासीक वारसा आहे. अनेक बौद्ध बांधवांची आस्था याठीकाणी जुळलेली आहे त्यामुळे दिक्षाभुमीचा कायापालट करण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करुन द्यावा, या सोबतच चंद्रपुर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रिय उद्यान, गोंडकालीन किल्ले आहेत. जागतीक पर्यटनाच्या दृष्टीने या सर्वांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी द्यावा अशी मागणी धानोरकर यांनी भेटी दरम्यान केली.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.