चंद्रपूर - नाल्याला आलेल्या पुरात जनावरांचा कळप सापडला. यात जवळपास पंधरा जनावरे वाहून गेली आहेत. वाहून गेलेली सात मृत जनावरे सापडली असून उर्वरित जनावरांचा शोध सुरू आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यात सोमणपल्ली येथे बुधवारी संध्याकाळी घडली.
गोंडपिंपरी तालुक्यात दोन दिवसापासून संततधार सुरू आहे. यामुळे सोमणपल्ली-धाबा मार्गावरील मोठा नाला दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, गावाकडे निघालेला गुरांचा कळप नाल्याला आलेल्या पुरात सापडला. यात जवळपास पंधरा जनावरे वाहून गेलीत. वाहून गेलेल्या पैकी सात जनावरे कोंढाणा-सोमणपल्ली मार्गातील पडक्या पुलात अडकून होती. पूर ओसरल्याने घटना उघडकीस आली. पुरात अडकलेली सात जनावरे नागरिकांनी बाहेर काढली.