ETV Bharat / state

चिखली-अमडापूर मार्गावरील कार अपघातात दोन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

author img

By

Published : Jan 16, 2020, 9:26 AM IST

चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला,तर तिघे गंभीर जखमी झाले.

two people were killed a car accident  in Chikhali - Amadapur road
चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघातात दोन जण ठार, तिघे गंभीर जखमी

बुलडाणा - चिखली-अमडापूर मार्गावरील कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज (बुधवारी १५ जानेवारी) सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलवण्यात आले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

पुणे येथील काही कामानिमित्त ते (एम-एच-३०-ए-टी-३००९) क्रमांकाच्या कारने खामगाव तालुक्यातील कांचनपूर या आपल्या मूळ गावी निघाले होते. दरम्यान, बुधवारी पहाटे सातच्या अमडापूरनजीक कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (वय५०) व प्रीती विलास बहुरुपे (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (वय ६० ), स्रेहल श्रीकांत भोजने (वय २७ ), विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठवले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Intro:Body:बुलडाणा:- चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघातात दोन जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी १५ जानेवारीच्या सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून  वर्तविण्यात येत आहे.
   
पुणे येथील काही कामानिमित्त ते एम-एच-३०-ए-टी-३००९ क्रमांकाच्या कारने खामगाव तालुक्यातील कांचनपूर या आपल्या मूळ गावी निघाले होते. दरम्यान बुधवारी पहाटे सात वाजेच्या दरम्यान अमडापूरनजीक कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (वय५०) व प्रीती विलास बहुरुपे (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (वय ६० ), स्रेहल श्रीकांत भोजने (वय २७ ), विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन
जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविले.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची आशंका पोलिसांनी व्यक्त केली आहे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.