ETV Bharat / state

'दारू नाही तर दूध प्या', बुलडाण्यात व्यसनमुक्तीने नव्या वर्षाचे स्वागत

author img

By

Published : Dec 31, 2020, 7:16 PM IST

Updated : Dec 31, 2020, 7:56 PM IST

नववर्षाचे स्वागत करताना दारू ऐवजी दूध पिण्याचा सल्ला देत बुलडाण्यातील शिवसंग्रामने नवी मोहिम हाती घेतली आहे. संदिप गायकवाड गेल्या सात वर्षांपासून 'दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत', करा असा कृतीतून संदेश देत आहेत.

milk distribution in buldana
'दारू नाही तर दूध प्या', बुलडाण्यात व्यसनमुक्तीने नव्या वर्षाचे स्वागत

बुलडाणा - नववर्षाचे स्वागत करताना दारू ऐवजी दूध पिण्याचा सल्ला देत बुलडाण्यातील शिवसंग्रामने नवी मोहिम हाती घेतली आहे. संदिप गायकवाड गेल्या सात वर्षांपासून 'दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत', करा असा कृतीतून संदेश देत आहेत. आज गुरुवारी 31 डिसेंबर रोजी त्यांनी संगम चौकातील वाईन शॉपजवळ युवकांना दूध वाटप केले.

'दारू नाही तर दूध प्या', बुलडाण्यात व्यसनमुक्तीने नव्या वर्षाचे स्वागत
वाईनशॉप दुकानासमोर 'दारू नको दूध प्या' हा उपक्रमवर्षाचा शेवटचा म्हटलं, की सर्वत्र जोरदार सेलिब्रेशन सुरू असतं. युवा वर्ग पार्ट्यांकडे ओढला जातो. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी, दारू पिऊन वाहन चालवणे यांसारखे प्रकार घडतात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा बोजवारा उडतो. तसेच दारूमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. असे प्रसंग टाळण्यासाठी शिवसंग्राम परिवाराने गेल्या ७ वर्षांपासून व्यसन मुक्तीसाठी पाऊल उचलले आहे.

व्यसनमुक्त तरुणच देशाची खरी संपत्ती आहे, हे ओळखून गायकवाड परिवाराच्या वतीने 31 डिसेंबरच्या सकाळी संगम चौकातील वाईनशॉप दुकानासमोर 'दारू नको दूध प्या' हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमातून शेकडो लोकांना दुधाचे मोफत वाटप करून त्यांनी व्यसनमुक्तीचा नारा दिला. यावेळी त्यांचा या उपक्रमाची स्तुती होत आहे.

Last Updated : Dec 31, 2020, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.