ETV Bharat / state

बुलडाणा : नवनिर्वाचित आमदारांसह पराभूत उमेदवारही शेतबांधावर

author img

By

Published : Oct 30, 2019, 8:53 AM IST

Updated : Oct 30, 2019, 9:25 AM IST

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या परतीच्या पावसाने ओढला आहे. जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांसह विजय न मिळवू शकलेले उमेदवारही व्यथा ऐकण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधांवर जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही आमदारांनी दिले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील आमदारांसह विजय न मिळवू शकलेले उमेदवारही शेतबांधावर

बुलडाणा - जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या परतीच्या पावसाने ओढला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कापूस, मका, सोयाबीन, तिळा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांसह विजय न मिळवू शकलेले उमेदवारही व्यथा ऐकण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.

ज्ञानेश्वर पाटील

विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात विजय प्राप्त करणारे आमदार अ‌ॅड. आकाश फुंडकर, डॉ.संजय कुटे, श्वेता महाले, राजेश खेकडे, संजय गायकवाड आदी सर्वांनी स्वागत-सत्कार बाजूला सारून ओल्या दुष्काळाने बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून पिकांची पाहणी केली. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पमचनामे करण्याचे आदेश आमदारांनी दिले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही दिल्या.

हेही वाचा - एक दिवा गोरगरिबांच्या दारी, दिव्या फाऊंडेशनचा पुढाकार

याशिवाय, खामगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिले काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनीही शेतकऱ्यांना भेट दिली. निवडणुकीत अपयश आले तरी मतदारसंघातील बहुतांशी शेतकरी आपल्या पाठीशी असल्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे आपले कर्तव्य आहे, अशा भावनेतून त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

Intro:Body:
Story : सर्वच नवनिर्वाचित आमदार पोहचले शेतबांधावर...
स्वागत सत्कार स्वीकारले नाही


Anchor : विधानसभांच्या निवडणुका नुकत्याच पार पडले आहेत या निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांनी अनेक ठिकाणी स्वागत सत्कार न स्वीकारता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या शासन दरबारी मांडून निकाली काढण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दाखविली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांशी आमदारांसह निवडणुकांमध्ये अपयश प्राप्त करणाऱ्या काही नेत्यांनीही ओला दुष्काळ बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Vo : जिल्ह्यात सुरूच असलेल्या संतत धार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे...शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या सणासुदीला परतीच्या पावसाने ओढला आहे. बुलडाणा जिल्ह्यतील मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद श संपूर्ण जिल्ह्यात शेतातील कापुस,मका,सोयाबीन सह तिळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून होवुन या पिकांना चक्क कोंब फुटले आहे.तर मका, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात विजयश्री प्राप्त करणारे खामगाव चे आमदार एडवोकेट आकाश फुंडकर, ना. डॉ.संजय कुटे यांच्यासह चिखलीचे आमदार श्वेता महाले मलकापूरच्या आमदार राजेश खेकडे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह खामगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिले काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील या सर्वांनी जिल्ह्यातील ओला दुष्काळाने बाधित असलेले शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली एवढ्यावरच न थांबता यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनानुकसानग्रस्त शेतीचा तत्काळ सर्वे करून त्याचे पंचनामे तयार करण्याचे आदेश आमदारांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ देण्याच्या सूचनाही दिल्या. कर्मचार्‍यांना दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवून शासन आपल्या पाठीशी असल्याचे दर्शविले आहे. दुसरीकडे निवडणुकीत अपयश आले तरी मतदारसंघातील बहुतांशी शेतकरी आपल्या पाठीशी असल्याने त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे आपले कर्तव्य समजून खामगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार राहिले ज्ञानेश्वर पाटील आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनीही मंगळवारी शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या याशिवाय शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शासनाकडे त्यांनी केली आहे.

Vo : एकंदरीत निवडणुकीनंतर विजय प्राप्त करणाऱ्या आमदारांनी जिल्ह्यातील ओला दुष्काळाची परिस्थिती पाहता स्वागत सत्कार स्वीकारले नाही आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ते शेत बांधावर पोहोचले आहे.

बाईट - ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस नेते- खामगाव)

-फहीम देशमुख खामगाव (बुलढाणा)
मो-9922014466Conclusion:
Last Updated : Oct 30, 2019, 9:25 AM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.