ETV Bharat / state

Unseasonal Rains : कर्मचारी संपावर असल्याने रखडले पंचनामे, अवकाळी पावसाचे नुकसान कसे समजणार?

author img

By

Published : Mar 19, 2023, 11:27 AM IST

बुलडाण्यात मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने बळीराजाला अडचणीत आणले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अक्षरशः झोपून गेला आहे. शेतातले पीक भुईसपाट झाले आहे. त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शनसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे पंचनामे राम भरोसेच आहे. ड्युटीवर नसलेला पाऊसाची हजेरी, ड्युटीवर नसलेल्या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी

Unseasonal Rains
Unseasonal Rains

अवकाळी पावसाने बळीराजाला अडचणीत

बुलडाणा : बुलडाणा : यंदाच्या पावसाळ्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने कहर केला. त्यामुळे खरिपाची पिके हातची गेली. शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी पिकावर होते. मुसळधार पावसामुळे धरणे, विहिरी ओसंडून वाहत होत्या. त्यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला, मोहरी आदी पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. 17 मार्च रोजी दुपारी, रात्री जिल्ह्यातील मेहकर, चिखली, लोणार, बुलढाणा, मेरा बु., देऊळगाव साखरशा, सिंदखेडराजा, जानेफळ, खामगाव, शेगाव आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. मात्र, तरीदेखील सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही. मागील वर्षाचा पीक वीमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही. या थापाडे सरकारला शेतकऱ्याचे प्रश्न कधी कळतील असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

गहू, हरभऱ्याचे नुकसान : खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव, शहापूर, पळशी, संभापूर, कदमपूर, आंबेटाकळी, शिर्ला नेमाने, लोखंडा, पल्ला, बोरी आरडगाव आदी भागात वादळ, पावसाचा तडाखा बसला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे जिल्ह्यात रब्बीसह कांदा, भाजीपाला, टरबूज, लिंबू, आंबा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता.

तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस : गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांचे हाल होत असून, सर्वेक्षणातून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, 20 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, साठवलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. खामगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश कृषी विभाग, तलाठ्यांना देण्यात आल्याची प्रतिक्रिया खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली आहे. सध्या महसूल कृषी कर्मचारी संपावर आहेत. 28 तारखेपासून अधिकारीही संपावर जाणार आहेत. संपावरील कर्मचाऱ्यांमुळे महसूलची कामे ठप्प झाली असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही रखडल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान : जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून १७ मार्च रोजी रात्री वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पाड्यावर पेरणी केलेले गहू, हरभरा पूर्णपणे कोमेजला आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. यामध्ये खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती असून, तहसीलदार अतुल पाटोळे यांनी नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नुकसानीचे पंचनामे करणारी यंत्रणा संपावर : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सिंदखेड राजा तालुक्यात जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मका हे पीक वाया गेले आहे. जुन्या पेन्शनसाठी शेतकरी संपावर गेल्याने झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करणारी यंत्रणा आता या शेतकऱ्याच्या नुकसानीचे मूल्यांकन कोण करणार? असा प्रश्न पडतो का? त्यामुळे निसर्गाने आधीच शेतकऱ्याचा विश्वासघात केला असून पंचनामा यंत्रणा संपावर गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव चिखली तालुक्यात मुसळधार पाऊस झाला तर सिंदखेडराजा तालुक्यात गारपीट झाली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

हेही वाचा - Amravati News: अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादनावर संकट; शेतकऱ्यांची अवस्था बिकट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.