ETV Bharat / state

Buldhana Accident News : खामगाव रोडवर भीषण अपघात; सासू-सासरे अन् सुनेचा अंत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 10:43 PM IST

Buldhana Accident News : बुलढाणा खामगाव रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक (Two wheeler Accident) दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू (Three Death On The Spot) झाला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Buldhana Accident News
भीषण अपघात

बुलढाणा Buldhana Accident News : खामगाव रोडवरील तसेच शहरातून अवघा पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरी गावाच्या फाट्याजवळ शनिवारच्या संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. फुलांचा माल घेऊन जाणाऱ्या आयशर गाडीने दुचाकीला मागून जोरदार धडक (Two wheeler Accident) दिली. परंतु चालक आयशरसह फरार झाला आहे. या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख फिरदोस शेख नईम, हमिदाबी शेख नईम अशी दोघांची नावे आहेत. तर त्यांची सून शेख नईम शेख मुन्नी यांचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

चिमुकल्याला डोक्यावर किरकोळ मार : एकाच कुटुंबातील एकूण चार जणांचा या अपघातात समावेश आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू तर चिमुकल्याला डोक्यावर किरकोळ मार लागला आहे. तो सुखरूप असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ दाखल झाले होते. दरम्यान दिव्यसेवा प्रकल्पाच्या रुग्णवाहिकेतून मृतांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्या होता. पुढील तपास पोलीस करत आहे.

भीषण अपघातात 3 जण जागीच ठार : असाच आणखी एक अपघात घडला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडनजीक शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला वॅगनर कारनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात (Car Accident News) झाला आहे. मृतांमध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलिसासह त्याची बहिण आणि भाच्याचा (Kolhapur Police Constable Died On Spot) समावेश आहे. अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी आणि कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता.

उभ्या ट्रकला कारची पाठीमागून धडक : घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) गावच्या हद्दीत बंद पडलेला ट्रक महामार्गाच्या कडेला उभा होता. यावेळी कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्‍या वॅगनर कारनं (क्र. एम. एच. 01 ए. एल. 5458) उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

हेही वाचा -

Buldhana Bus Accident : एसटी बसचा अपघात; स्टिअरिंग रॉड लॉक झाल्याने गाडी पलटी, पाहा व्हिडिओ

Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघातस्थळाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट; जखमींची केली विचारपूस

Samruddhi Mahamarg Accident: सिंदखेड राजाजवळ अर्टिका गाडीचा भीषण अपघात, 2 मुले 4 महीला ठार; 6 गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.