ETV Bharat / state

गृहमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी बुलडाण्यात भाजपचे निदर्शने

author img

By

Published : Mar 21, 2021, 7:10 PM IST

Updated : Mar 21, 2021, 7:42 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप केला. याच्या निषेधार्थ बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात माजी कामगार मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ.संजय कुटे यांच्या नेतृत्वात जोरदार निर्दशने करण्यात आले.

bjp-agitation-against-home-minister-in-buldana
आंदोलक

बुलडाणा - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप केला. गृहमंत्री देशमुख यांच्या 100 कोटी वसूलीच्या निषेधार्थ बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात माजी कामगार मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ.संजय कुटे यांच्या नेतृत्वात जोरदार निर्दशने करण्यात आले.

बोलताना आमदार कुटे

शिवालय ते जयस्तंभ चौकापर्यंत रॅली काढून निदर्शने

स्थानिक विश्रामगृह जवळील भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या शिवालय जनसंपर्क कार्यालय येथून संगमचौक मार्ग जयस्तंभ चौकापर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. यानंतर जयस्तंभ चौकात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने जोरदार निदर्शने देत गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली.

जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्त्यांनी रिंगण करून अडवून धरला होता रस्ता

यावेळी जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्त्यांनी रिंगण करून काही वेळ रस्ता अडवून धरला होता. या निदर्शनामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, दत्ता पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा - ...म्हणून पाकिस्तानला संपवलं पाहिजे - माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत

हेही वाचा - बुलडाण्यात एसटी बस पैनगंगा नदीत पडता-पडता वाचली

Last Updated : Mar 21, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.