ETV Bharat / state

अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Apr 11, 2021, 9:07 PM IST

दारूची वाहतूक करणारा आरोपी अटकेत
दारूची वाहतूक करणारा आरोपी अटकेत

देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली असून दारू आणि वाहनासह एकुण 98 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात एक आरोपी फरार झाला आहे.

बुलडाणा - देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली असून दारू आणि वाहनासह एकुण 98 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात एक आरोपी फरार झाला आहे. अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव विक्की राजेश ओवाळकर रा.नांदुरा असे आहे.

कुऱ्हा काकोडा गावाकडून पिंपळगावकाळे एक पांढऱ्या रंगाची गाडीत (एमएच २८ सी १३९६) देशी व विदेशी दारुची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पिंपळगावकाळे येथील एमएसईबी पावर हाऊसला रात्री दिड वाजताच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली. याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या वाहनाला थांबवण्यात आले असता आरोपी पळाला तर एकाला पकडले. विक्की राजेश ओवाळकर (रा.नांदुरा) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

वाहनाची झडती घेतली असता गाडीमध्ये देशी दारु टॅंगो पंच ९० एमएल प्रत्येकी किंमत ३० रुपये अशा ४०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत १२ हजार रुपये व इम्पेरियल ब्लु कंपनीच्या १८० एमएल प्रत्येकी किंमत १४० रुपये अशा ४८ बाटल्या मिळाल्या. याची एकूण किंमत ६ हजार ७२० रुपये व गाडी किंमत ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक
प्रल्हाद मदन व गणेश पाटील यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.