ETV Bharat / state

Buldhana Accident : भीषण अपघातात दोन जिवलग मित्र ठार; भरधाव स्विफ्ट कार पळसाच्या झाडावर आदळली

author img

By

Published : Jan 30, 2023, 12:39 PM IST

Updated : Jan 30, 2023, 1:15 PM IST

बुलडाणा जिल्ह्यामध्ये भरधाव स्विफ्ट कार पळसाच्या झाडावर आदळल्याने मोठा अपघात घडला. चिखली साकेगाव रोडवरील घटनेत दोन जण जागीच ठार तर ३ गंभीर जखमी झाले आहे.

Buldhana Acciden
भीषण अपघातात दोन जिवलग मित्र ठार

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये समृद्धी मार्ग असू दे किंवा शहरातील इतर मार्ग अपघाताचे प्रमाण थांबता थांबत नाही आहे. वाहनांवर अनियंत्रित वेग, गुळगुळीत रस्ते आणि त्यामुळे अनियंत्रित झालेले वाहन एका मोठ्या अपघाताला सामोरे जाते. अपघातामध्ये अनेक जीव जातात. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीकरांसाठी 30 जानेवारीची सकाळ काळजाचा थरकाप उडवणारी बातमी घेऊन उजाडली आहे.



एकमेकांचे जिवलग मित्र : चिखली येथील माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांचे लहान बंधू सुनील देव्हडे यांच्यासह आणखी एकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. चिखली साकेगाव रस्त्यावरील वाघापूरजवळ आज 30 जानेवारीच्या पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला आहे. सुनील किसनराव देव्हडे वय वर्ष ३३, हर्षद पांडे वय वर्ष 30, अशी अपघातात ठार झाल्याची नावे आहेत. तर यश वाधवानी आणि आकाश चिंचोले दोघे राहणार चिखली आणि पप्पू राजपूत राहणार साकेगाव तालुका चिखली अशी अपघातात गंभीर जखमी झाल्यांची नावे आहेत. अपघातातील मृत व्यक्ती आणि जखमी हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. साकेगावच्या पप्पू राजपूतला घरी सोडण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने पाचही जण जात होते. वाघापूर जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली असलेल्या पळसाच्या झाडावर आदळली.



दोघांचा जागीच मृत्यू : अपघातने झाडही जमिनीतून मुळासकट उखडले. या भीषण अपघातात सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर यश वाधवानी आकाश चिंचोले, पप्पू राजपूती गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून. दोघांचे मृतदेह तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताने चिखली परिसरात शोककळा पसरली आहे. एकंदरी या जिवलग मित्रांच्या अपघातमध्ये मृत्यु झाल्यामुळे परिसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे.

अपघातांची मालिका सुरू : या आधीही असाच एक अपघात घडला होता. काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. 20 जानेवारीच्या सकाळी नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात 20 ते 23 प्रवासी जखमी तर एक प्रवासी ठार झाले होते.

हेही वाचा: Accident on Samriddhi Highway समृद्धी महामार्गावर भीषण अपघात एक ठार 20 ते 23 प्रवासी जखमी

Last Updated : Jan 30, 2023, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.