ETV Bharat / state

एमआयएमचा प्रस्ताव सध्या तरी काँग्रेसला मिळाला नाही, प्रस्ताव आल्यावर विचार करू - नाना पटोले

author img

By

Published : Mar 19, 2022, 5:25 PM IST

मोदी सरकारमध्ये भागवत कराड हे मंत्री असले तरी त्यांना किती अधिकार आहेत, त्यांनी ते सर्वांना सांगावे. खर तर त्यांच्या कुठल्याही फाईल नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्यापर्यंत जात नाहीत. केवळ माध्यमांसमोर काहीतरी बोलायचे आणि स्वतःला मोठे करुन घ्यायचे, असा त्यांचा खटाटोप सुरू आहे. इतरांच्या पक्षातील आमदार आणण्याची भाषा करण्यापेक्षा भाजपातील बरेच नाराज आमदार इतर पक्षात पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केली.

नाना पटोले
नाना पटोले

भंडारा - काँग्रेसला अद्याप एमआयएमचा ( AIMIM ) प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर विचार करू, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी व्यक्त केले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर पटोले त्यांच्या मुळगावी सुकळी येथे बोलत होते. ते म्हणाले, एमआयएम काँग्रेसच्या विचारांशी सहमत असेल तर त्यांच्या प्रस्तावाबाबत विचार करू.

बोलताना नाना पटोले

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ( Devendra Fadnavis on Balasaheb Thackeray ) नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस काहीही बोलू शकतात. उचलली जीभ लावली टाळूला, अशी अवस्था त्यांची झाली आहे. त्यामुळे काही बोलू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपातील नाराज आमदार इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यावे - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ( Union Minister of States Bhagwat Karad ) यांनी महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर नाराज आमदारांनी भाजपसोबत यावे, अशी ऑफर दिली आहे. यावर पटोले म्हणाले, मोदी सरकारमध्ये भागवत कराड हे मंत्री असले तरी त्यांना किती अधिकार आहेत, त्यांनी ते सर्वांना सांगावे. खर तर त्यांच्या कुठल्याही फाईल नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्यापर्यंत जात नाहीत. केवळ माध्यमांसमोर काहीतरी बोलायचे आणि स्वतःला मोठे करुन घ्यायचे, असा त्यांचा खटाटोप सुरू आहे. इतरांच्या पक्षातील आमदार आणण्याची भाषा करण्यापेक्षा भाजपातील बरेच नाराज आमदार इतर पक्षात पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा - भंडारा: हुतात्मा चंद्रशेखर भोंडे यांना नागरिकांनी दिला अखेरचा निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.