ETV Bharat / state

Grampanchayat Election : मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात; चिखली गावातील प्रकार

author img

By

Published : Dec 18, 2022, 6:45 PM IST

ग्रामपंचायत निवडणूकीत बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात ( Grampanchayat Election at Chikhali in Beed ) बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत ( Voters in South Africa ) नोकरी करत आहे आणि त्याचे मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गावकऱ्यांनी थेट तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली आहे.

Grampanchayat Election
Grampanchayat Election

चिखली गावात ग्रामपंचायत निवडणूकीत बोगस मतदानाचा प्रकार

बीड : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकींची ( Grampanchayat Election ) रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूकी निमित्ताने विविध प्रकरणे समोर येत आहेत. बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

मतदाराच्या अनुपस्थितीत मतदान : बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत ( Voters in South Africa ) नोकरी करत आहे त्याचे मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सध्या गावामध्ये उपस्थित नसताना त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले.

Grampanchayat Election
गावकऱ्यांची तहसीलदाराकडे तक्रार

गावकऱ्यांनी केली तक्रार : ग्रामपंचायत निवडणूक ( Grampanchayat Election ) झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट गावकऱ्यांनी तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे. मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.