ETV Bharat / state

परळीत लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे रुग्णांसाठी वाहन सुविधा

author img

By

Published : Apr 27, 2021, 10:44 PM IST

परळी शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असुन रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते. येथील लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे आज परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश कुरमे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख यांच्या हस्ते वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

रुग्णांसाठी वाहन सुविधा
रुग्णांसाठी वाहन सुविधा

बीड - परळी शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असुन रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते. येथील लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख यांच्या हस्ते वाहनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे रुग्णांसाठी वाहन सुविधा
लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी सामाजिक भावनेतुन परळी वैजनाथ ते अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना माफक दरात फक्त 500 रुपये डिझेल खर्चात चारचाकी गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जाण्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिली आहे.

गरजूवंतानी संपर्क करण्याचे आवाहन
होंडा सीआरीव्ही गाडी क्रमांक MH 02 AK 6081 असून संपर्कासाठी हेल्पलाइन क्र : 9527413467 या मोबाइल क्रमांकावर वाहन चालक नितीन म्हस्के यांच्याशी गरजवंतांनी संपर्क करावा, असे लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी कळवले आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दतात्रय काळे, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध जोशी, मराठवाडा साथी पीसीएन संपादक मोहन व्हावळे, अश्विन मोगरकर, शंकर गायकवाड, विक्रम कुरील आदी उपस्थित होते.

हेही वाचा - 'लस उपलब्ध नसेल तर, 1 मेपासून सुरू होणारी लसीकरण मोहीम राबवायची कशी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.