Rohit Pawar On Devendra Fadnavis : “वाद निर्माण करण्याचा फडणवीसांचा डाव ”, पवारांच्या विधानानं खळबळ

Rohit Pawar On Devendra Fadnavis : “वाद निर्माण करण्याचा फडणवीसांचा डाव ”, पवारांच्या विधानानं खळबळ
मराठा आणि ओबीसी यांच्यातील संघर्षावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील काही नेत्यांचा वापर करून वाद निर्माण करत असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.
बीड Rohit Pawar On Devendra Fadnavis : राज्यात आरक्षणावरुन मराठा विरुद्ध OBC यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. तिसर्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील दौरा करणार आहेत, तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये छगन भुजबळ ओबीसींची ताकद दाखवणार आहेत. या संघर्षाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्फोटक विधान केलं आहे. राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठा वादावर बोलताना रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयची दुरुस्ती : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी बीड शहरासह जिल्ह्यात काही समाजकंटकांनी जाळपोळ तसंच दगडफेक केली होती. बीडमधील राष्ट्रवादीचं कार्यालयही त्यावेळी जाळण्यात आलं होतं. या कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आली आहे. या कार्यालयाचं नुतनीकरण रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. दिवाळी पाडव्यानिमित्त रोहित पवार यांनी येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली.
कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा : यावेळी रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पहिल्यांदाच पवार कुटुंबातील एखाद्या सदस्याला अशा पद्धतीनं दुसऱ्या ठिकाणी पाडवा साजरा करावा लागत आहे. मात्र, मी संदीप क्षीरसागर यांना वचन दिलं होतं, त्यानुसार मी कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहे. काही लोक मुद्दाम वाद निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांची भूमिका संशयास्पद : जाळपोळीच्या घटनेबाबत रोहित पवार म्हणाले, "बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. त्यांनी साधा सायरनही वाजवला नाही. त्यामुळं सरकार काहींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. यावेळी आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी भवनाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप देखील केला.
हेही वाचा -
- Ramdas Kadam on Gajanan Keertikar : कोणत्याही परिस्थितीत आपला एक खासदार कमी होता कामा नये - रामदास कदम यांची स्पष्टोक्ती
- Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस सहकुटुंब मथुरेत, पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर काय म्हणाले?
- Sharad Pawar On Viral Caste Certificate : जगाला माझी जात माहिती आहे; मी कधी जातीवाद केला नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण
