Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस सहकुटुंब मथुरेत, पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर काय म्हणाले?

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस सहकुटुंब मथुरेत, पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर काय म्हणाले?
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सहकुटुंब मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करण्याचं टाळलं.
मथुरा (उत्तर प्रदेश) Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी उशिरा सहकुटुंब उत्तर प्रदेशच्या मथुरेत पोहोचले. तेथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तसेच गार्ड ऑफ ऑनर देऊन मानवंदना दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह श्रीकृष्ण जन्मभूमीला भेट देऊन पूजाअर्चा केली.
मथुरेत खूप बदल झालेत : मंगळवारी देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासह मथुरेतील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी पोहोचले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस राजकीय प्रश्न टाळताना दिसले. "आज श्रीकृष्ण जन्मभूमीला भेट देण्याचं भाग्य मला लाभलं", असं ते म्हणाले. "मी इथे खूप वर्षांनी इथे आलो आहे. मी म्हणू शकतो की इथे खूप बदल झालेत. इथली सर्व व्यवस्था बदललेली दिसते. तसेच येथील स्वच्छतेमुळे अतिशय चांगलं वातावरण निर्माण होत आहे", असं ते म्हणाले. "ब्रजची संपूर्ण भूमी भक्तीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. असाच अनुभव आणि भक्तीची भावना मला इथे मिळाली आहे, असं त्यांनी नमूद केलं.
राजकीय प्रश्नांवर भाष्य करण्याचं टाळलं : यावेळी बोलताना फडणवीसांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करण्याचं टाळलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'या सगळ्या गोष्टी सोडा. मी देवाच्या चरणी आलो आहे. या सगळ्या गोष्टींना येथे काही अर्थ नाही, असं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा येण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'मी देवाकडे काही मागत नाही. राजकारणाविषयी तर बिलकूल नाही. आपला देश पुढे जावा हेच माझं देवाकडे मागणं आहे', असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
