ETV Bharat / state

Sharad Pawar On Viral Caste Certificate : जगाला माझी जात माहिती आहे; मी कधी जातीवाद केला नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 5:10 PM IST

Sharad Pawar On Viral Caste Certificate : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा कुणबी दाखला व्हायरल झाला होता. यावर शरद पवार यांच्यावर विरोधकांनी हल्ला चढवला होता. आता विरोधकांच्या टीकेला शरद पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे.

Sharad Pawar On Maratha Reservation
शरद पवार

पुणे Sharad Pawar On Viral Caste Certificate : मागील दोन दिवसांपासून शरद पवार ओबीसी समुदायातील असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं एक जात प्रमाणपत्र कारणीभूत ठरलंय. हे जात प्रमाणपत्र शरद पवारांचं असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आरक्षण प्रश्न आता केंद्र सरकारचा झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रश्न मांडले आहेत. मराठा आरक्षणाबद्दल तरुणांची भावना तीव्र झाली आहे. यात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारचा आहे. काही लोकांनी माझा दाखला बनवला आहे. मात्र सगळ्या जगाला माहिती आहे की, माझी जात कुठली आहे. मी कधीही जातीवाद केला नाही. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

पाडव्याला राज्यातील लोक बारामती मध्ये येतात : गेल्या 50 वर्षापासून पाडव्याला राज्यातील लोक बारामतीमध्ये येतात. आता लोक 2 दिवस आधी येतात. पाडव्याला गर्दी (Diwali Padwa 2023) असते, म्हणून आम्ही लवकर येतो. मी आज सकाळी 6.30 पासून हजारो लोकांना भेटलो आहे. मराठवाडा, पुणे शहर, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामधून लोक भेटले. ही दिवाळी आणि नवीन वर्ष देशातील सर्व सामान्य माणसांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं. ७० टक्के हे लोकं तरुण आहेत आणि ते मला भेटायला येतात त्यात मला आनंद आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ही सगळी देवेंद्र फडणवीसांची खेळी : लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. त्यामुळंच सर्वसामान्यांचे मुख्य प्रश्न बाजूला सारून जनतेला भरकटण्याचं काम भाजपाकडून होत आहे. ही सगळी रणनीती नागपूरकर तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आखत असल्याचा आरोपरोहित पवार यांनी केला. तसंच सध्या सोशल मीडियावरून शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला फिरत आहे. तो खोटा आहे. याबाबतीत आमचे नेते योग्य ते स्पष्टीकरण माध्यमाकडं येऊन सादर करतील, अशी माहिती रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला आला समोर : शरद पवार यांचं ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं खोटं सर्टिफिकेट व्हायरल झाल्यानंतर ते खोटं असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी केला होता. तसंच विकास पासलकर यांनी शरद पवारांचा शाळा सोडतानाचा दाखला समोर आणला. या प्रमाणपत्रावर 'मराठा' असा उल्लेख दिसत आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On Maratha Reservation : आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये; मराठा आरक्षणावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
  2. Sharad Pawar On Maratha Reservation : केंद्र, राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा - शरद पवार
  3. Sharad Pawar On Maratha Reservation : आंदोलकांवर बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, पवारांचं सरकारवर टीकास्त्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.