ETV Bharat / state

Pankaja Munde Dussehra Melawa :पंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर राडा; पोलिसांचा लाठिचार्ज

author img

By

Published : Oct 5, 2022, 2:43 PM IST

Updated : Oct 5, 2022, 3:18 PM IST

पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यानंतर गदारोळ
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यानंतर गदारोळ

बीड - दसऱ्यानिमित्त भगवानगडावर आयोजित पंकजा मुंडे याच्या दशरा मेळाव्यात गदारोळ ( Riots Pankaja Munde Dussehra Melawa ) झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आहे. पंकजा मुंडे यांनी अवाहन केल्यानंतरही काही तरुणांनी गोंधळ घालायला सुरवात केली. या मेळाव्याला महिलांची संख्या कमी होती मात्र, तरुणाची संख्या खुप माठ्या प्रमाणवर उपस्थित होती.

बीड - दसऱ्यानिमित्त भगवानगडावर आयोजित पंकजा मुंडे याच्या दशरा मेळाव्यात ( Pankaja Munde Dussehra Melawa ) गदारोळ झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज ( Police baton charge ) करावा लागला आहे. पंकजा मुंडे यांनी अवाहन केल्यानंतरही काही तरुणांनी गोंधळ घालायला सुरवात केली. या मेळाव्याला महिलांची संख्या कमी होती मात्र, तरुणाची संख्या खुप माठ्या प्रमाणवर उपस्थित होती.

पोलिसांनी केला लाठीचार्ज - भगवान बाबाची मोठी मुर्ती या ठिकाणी बसवण्यात आली आहे. पंकजा यांच्या भाषना नंतर एकच गोंधळ उडाला. तरुणांमधे हुल्लडबाजी, घोषणाबाजीनंतर अचानक हा गोंधळ उडाला. पोलीसांनी बळाचा वापर करत हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला. समर्थक घोषनाबाजी करत होते पोलीसांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी गोंधळ सुरुच ठेवला त्यातुन हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मेळाव्याच्या वेळीही थोडाफार गोधळ थोड्या फार प्रमाणात शुरुच होता. पंकजा तसेच खा. प्रितम यांनी वेळो वेळी शांततेचे आवाहन केले होते. पंकजा यांनी तर तरुण कार्यकर्त्यांना भगवान बाबांची शपथ घातली होती.

दरम्यान, आज पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर दशरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी मला पक्षाने संधी दिली तर मी 2024 ला परळी मतदार संघातून निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. निवडणुकीचा प्रचार आतापासूनच करणा असल्याचाही उल्लेश त्यांनी केला. प्रतेक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याकडे पद असावे असे वाटते त्यात गैर काय आहे, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. संघर्षाला मी घाबरत नाही.

मुंडेनी चिखलात कमळ फुलवले - शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता तसेच गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे पंकजा म्हणाल्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की मी कोणापुढेही झुकणार नाही, मी कधीच थकनार नाही मी तसेच माझ्या परिवाराने कायम संघर्ष केला आहे, पुढेही हा संघर्ष सुरू राहणार अल्याचा उल्लेख त्यांनी केला. दोन वेळा माझ्या सभेला अमितभाई शाह आले होते. त्यांनी आपली गर्दी पाहिली, रानावनातून लोक जमा झालेले त्यांनी पाहिले. त्यामुळे मी गर्दी जमवते हा आरोप मला मान्य नाही.संघर्ष कुणालाच चुकला नाही, जे जे जोडे उचलतात ते कधीही इतिहास लिहित नाही असेही पंकजा म्हणाल्या. ज्या पक्षात कुणीही जात नव्हते त्या पक्षाचे कमळ घेऊन त्यांनी चिखलात कमळ फुलवला, पक्ष वाढवला. 40 वर्षांच्या आयुष्यात केवळ त्यांना साडेचार वर्षांचीच सत्ता मिळाली. मुंडेंनी जो ध्वज खांद्यावर घेतला आहे तो ध्वज पुढे घेऊन जाणार आहे अशा त्या म्हणाल्या.

Last Updated :Oct 5, 2022, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.