ETV Bharat / state

Pankaja Munde In Beed: क्षीरसागरांसोबत चहा न घेताच पंकजा मुंडेंनी घेतला काढता पाय

author img

By

Published : Jan 30, 2023, 10:48 PM IST

बीड जिल्ह्यातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आज (सोमवारी) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मात्र पंकजा मुंडे यांनी अवघ्या काही क्षणातच काढता पाय घेणे पसंत केले. यामुळे क्षीरसागर सोबत न घेतलेल्या चहाची चर्चा चांगलीच रंगली.

Pankaja Munde In Beed
पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे

बीड : जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघातील सर्व बूथवर जयदत्त क्षीरसागर यांची यंत्रणा तळ ठोकून आहे. बीड शहरातील चंपावती बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आलेले माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बूथ केंद्रावरच भेट घेतली. पंकजा मुंडे यांनी क्षीरसागर येतात काढता पाय घेतला. त्या अगोदर पंकजा मुंडे कार्यकर्त्याच्या आग्रहाचा चहा पिण्यासाठी बूथवर थांबल्या होत्या. मात्र क्षीरसागर दाखल होताच पंकजा मुंडे चहा टाळून निघाल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात चहा दिला. गाडीमध्ये बसून चहा पीत पंकजा निघून गेल्या. भारतभूषण क्षीरसागर आल्यामुळे पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेत गाडीमध्ये चहा घेणे पसंत केले ? यावरून पंकजा मुंडे या क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी पंकजा मुंडे चहा घेत गाडीमध्ये बसून पुढे निघून गेल्या. तर माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पॅनलमध्ये बसून चहा घेतला. या चहाची चर्चा चवीने होत होती.


काय म्हणाल्या पंकजा मुंडे? जिल्ह्यामध्ये भाजपची परिस्थिती चांगली आहे आणि मी औरंगाबादचा सुद्धा आढावा घेतलेला आहे. आता बीडच्या चंपावती शाळेतील बुधवार आलेला आहे आणि नंतर परळीच्या बुथवर जाणार आहे. वाटते की, शिक्षकांचा मतदानाचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. पर्यंत 55 ते 60 टक्के मतदान झाले आहे. प्रतिसाद चांगला आहे आणि आमची शीट सध्या रेसमध्ये आहे अशी चर्चा झाली आहे. आमचा उमेदवार विजयाकडे घोडदौड करत आहे असे मला आत्मविश्वासाने म्हणावे वाटत आहे. टीव्ही लावल्यानंतर दररोज कोणी ना कोणी कोणावर बोलत असताना मी प्रत्येक बोललं त्याला उत्तर देणे मला योग्य वाटत नाही. सरकारबद्दल विचारले असता सरकार मधलेच लोक बोलतील. त्याच्यावर मी बोलू शकत नाही, बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मग याच्यावरती जी आकडेवारी माझ्यासमोर येईल, मी त्यावर बोलेल असे पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य केले.

हेही वाचा : Asaram Convicted : शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू दोषी! गांधीनगर न्यायालय सुनावणार शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.