ETV Bharat / state

परळीत 48 तासांत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर

author img

By

Published : Apr 23, 2021, 12:10 PM IST

48 तासात परळी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. हे कोविड केअर सेंटर आज शुक्रवारपासून सुरू होणार आहे. 

dhananjay munde
धनंजय मुंडे

परळी (बीड) : परळी तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य सह अन्य यंत्रणा कामाला लावून 48 तासात परळी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. हे कोविड केअर सेंटर आज शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

परळी ग्रामीण रुग्णालयात सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक सामग्री दोन दिवसात उभारण्यात आली असून, यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते व इतरांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडली.

दरम्यान या 50 बेडच्या व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, यांपैकी 20 बेड आज तर उर्वरित 30 बेड येत्या दोन दिवसात रुग्णांसाठी उपलब्ध होतील. शिवाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या नियमित रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्षद शेख यांनी दिली आहे.

परळीत सध्या समाज कल्याण विभागाच्या दोन वस्तीगृहामध्ये मिळून सौम्य व लक्षणे नसलेल्या 200 पेशंटची सोय करण्यात आली आहे. या शिवाय शहरातील सात डॉक्टरांनी आपल्या खासगी रुग्णालयात करोना पेशंटवर उपचार सुरू केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.