ETV Bharat / state

केज विधानसभा : जनतेचा राग पक्षावर की नेत्यांवर? मुंदडा-साठेंच्या लढतीने होणार स्पष्ट

author img

By

Published : Oct 12, 2019, 1:13 PM IST

Updated : Oct 12, 2019, 3:33 PM IST

नमिता मुंदडा यांनी पक्ष बदलून भाजपकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देऊन ही दोन दीग्गज कुटुंबासाठी प्रतिष्ठेची लढत केली आहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सद्यस्थिती पाहता लोकांचा राग पक्षावर आहे की नेत्यांवर हे स्पष्ट होईल.

केज विधानसभा मतदारसंघ

बीड - जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी सोडचिठ्ठी देऊन मुंदडा कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला. नमिता मुंदडा यांनी पक्ष बदलून भाजपकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली. आता ही दोन दिग्गज कुटुंबातील लढत प्रतिष्ठेची झाली आहे.

व्यकटेस वैष्णव, प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या नमिता मुंदडा या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेऊन मुंदडा कुटुंबीयांना भाजपमध्ये घेतले आणि उमेदवारी दिली, अशी चर्चा आहे. केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी स्वतः शरद पवार यांनी नमिता मुंदडा यांचे नाव जाहीर केले होते. मुंदडा कुटुंबीयांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज साठे यांना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

हेही वाचा - परळीत कसली असुरक्षितता ? वहिनीने दिले नणंद पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सद्यस्थिती पाहता, केज विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढलेले मुंदडा कुटुंब यशस्वी होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यामुळे लोकांचा राग पक्षावर आहे की नेत्यांवर हे या लढतीतून स्पष्ट होईल.

Intro:केज विधानसभा: राग पक्षाच्या चिन्हावर की व्यक्तीवर; मुंदडा-साठे लढतीने होणार स्पष्ट

बीड- जिल्ह्यातील इतर विधानसभा निवडणुका पेक्षा केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक वेगळी आहे. पूर्वी राष्ट्रवादीत असणारे मुंदडा कुटुंबीयांनी भाजपकडून उमेदवारी घेतली खरी, मात्र जनतेचा राग काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर आहे की, पक्षातील नेत्यांवर आहे याचा फैसला केज विधानसभा मतदारसंघात जनता करणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केज ची निवडणूक वेगळी आहे. केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे व भाजपच्या नमिता मुंदडा या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विधानसभा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची केली आहे.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी धोका देऊन मुंदडा कुटुंबीय भाजपमध्ये गेले याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे पंकजा मुंडे यांनीच पुढाकार घेत कुटुंबियांना भाजपमध्ये घेतले व उमेदवारी दिली. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सुरू आहे या काळात जनतेचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वर प्रचंड राग असल्याचे दिसते याचा अनुभव नुकत्याच झालेल्या लोकसभेत देखील आला एकंदरीत अशी परिस्थिती असताना केज विधानसभा मतदार संघात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणुका लढलेले व अनेक पदावर काम केलेल्या मुजरा कुटुंबियांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला मात्र प्रश्न असा आहे की राग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबरोबरच पक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर देखील आहे असे असताना केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांनी पक्ष बदलून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे पात्र मात्र केज विधानसभा मतदारसंघातील जनतेचा राग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच त्या पक्षात काम करणाऱ्या मुंदडा कुटुंबियांवर पण आहे की, नाही हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे.

पृथ्वीराज साठे 'डोअर टू डोअर'

केज विधानसभा मतदार संघातून स्वतः शरद पवार यांनी नमिता मुंदडा यांचे उमेदवारीसाठी नाव जाहीर केल्यानंतर मंगळा कुटुंबियांनी केलेल्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज साठे यांना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मागील अनेक दिवसापासून साठे विधानसभा मतदारसंघ चित्र आहे याशिवाय भाजपचा नमिता मुंदडा यांनी महिलांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधायला सुरुवात केली आहे.Body:बीडConclusion:बीड
Last Updated : Oct 12, 2019, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.