ETV Bharat / state

Look Back 2022 : अवैध गर्भपात, शेतकरी आत्महत्या, शेतीचे नुकसान, रेल्वे पदार्पण या घटनांनी 2022 मध्ये ढवळून निघाला बीड जिल्हा

author img

By

Published : Dec 24, 2022, 3:43 PM IST

बीड जिल्ह्यातील (Look Back 2022) हिंगणगाव या ऊस उत्पादक शेतकऱ्याने उसाच्या फडात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ( farmer suicide) केली होती. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी काही साखर उत्पादक कारखाने बंद (Sugar factories shut down) असल्याने बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताची (illegal abortion) घटना घडली होती. याच दरम्यान मुलीचा गर्भ खाली (girl fetus destroyed) करण्यासाठी चक्क महिलेला जीव गमवावा (woman dies during abortion) लागला. 7 जून रोजी ही घटना घडली होती.

Look Back 2022
बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना

  1. कारखाना ऊस घेऊन जात नाही म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या
    15 मे रोजी कारखाना ऊस घेऊन जात नाही म्हणून गेवराई तालुक्यातील नामदेव अशोक जाधव वय ३२ हिंगणगाव या ऊस उत्पादक शेतकऱ्याने उसाच्या फडात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी काही साखर उत्पादक कारखाने बंद असल्याने बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि याच कारणाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कारखान्याचे उंबरठे झिजवावे लागले होते. अनेक वेळा कारखान्यांना चकरा मारूनही कारखाना घेऊन जात नाही म्हणून गेवराई तालुक्यातील जाधव नावाच्या शेतकऱ्यांना उसाच्या फडातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि जिल्ह्यातील संपूर्ण पोस्ट घेऊन जाण्यासाठी परिसरातील कारखान्यांना सक्ती केली.


  2. अवैध गर्भपात करताना महिलेने गमावला जीव
    बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताची घटना घडली होती. याच दरम्यान मुलीचा गर्भ खाली करण्यासाठी चक्क महिलेला जीव गमवावा लागला. 7 जून रोजी ही घटना घडली होती. अवैध गर्भपात करताना अति रक्तस्राव झाल्याने शीतल गाडे या 30 वर्षीय महिलेचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या प्रकरणी पती, सासू, सासऱ्या सह मयत महिलेच्या भावाला पोलिसांनी घेतल ताब्यात घेण्यात आले. पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अवैध गर्भलिंग निदान करून अवैध गर्भपात करताना अति रक्तस्त्रावामुळे रविवारी महिलेचा मृत्यू झाला होता यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. यावर पोलिसांनी कडक पाऊले उचलायला सुरूवात केली. आरोपींना ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी गर्भपात केला होता त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.


  3. अवैध गर्भपात प्रकरणातील एका नर्सची हत्या कि आत्महत्या?
    बीड तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेचा बीड परिसरातील पाली येथील तलावात मृतदेह आढळला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. सीमा सुरेश डोंगरे असे मयत महिलेचे नाव आहे. सीमा सिस्टर नावाच्या महिलेवर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आज पहाटे सदर महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाली येथील तलावात सिमा डोंगरे या महिलेचे शव आढळले आहे. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती नर्सचे काम करीत होती. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या ? याचा तपास पोलिस करत आहेत.


  4. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव
    बीड जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा कोळपिक गोगलगायना फस्त केले होते. याच प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील सोयाबीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागली होती. बीड जिल्ह्यातील 12959 शेतकऱ्यांचे गोगलगायीने नुकसान केले आहे. त्याचे क्षेत्र 3822.35 हेक्टर आहे.
    Look Back 2022
    सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव



  5. बीड सीमेवर रस्ता दुपदरी असल्याने सात जणांनी गमावले प्राण
    बीड व लातूर हा महामार्ग एक मृत्यूचा सापळा म्हणत आहे. या महामार्गावर अनेक जणांचे प्राण गेले आहेत. तर दुसऱ्या विशेष म्हणजे लातूर जिल्ह्याची सीमा ज्या ठिकाणावरून चालू होते तिथून पुढे लातूरपर्यंत चार पदरी रस्ता आहे तर ज्या ठिकाणाहून बीडची सीमा चालू होते तिथून अहमदनगर पर्यंत हा रस्ता दुपदरी असल्याने अपघात वाढत आहेत. मात्र याच्याकडे प्रशासन कसलच लक्ष देत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
    Look Back 2022
    कार अपघात



  6. 14 ऑगस्ट रोजी आमदार विनायक मेटे यांचे निधन
    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लोकनेते विनायक मेटे हे 14 ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठकीला पोहोचत असताना पुणे मुंबई महा मार्गावर अपघात झाला व याच अपघाताने लोकनेते विनायक मेटे मरण पावले.
    Look Back 2022
    विनायक मेटे अपघात



  7. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान
    सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला. त्यातील लाखो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याच नुकसानीला जिल्ह्यातील अनेक शेतकरी हातबल झाले. या नुकसानी पोटी शासनाला कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागली.
    Look Back 2022
    परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान



  8. अवैध गर्भपात प्रकरणी सासू व मुलाला अटक
    बीडच्या परळीतही अवैध गर्भपात करण्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला होता. बार्शी येथील डॉक्टर बोलावून एका सुशिक्षित कुटुंबातील महिलेचा अवैध गर्भपात घडवण्यात आला होता. यामध्ये संबंधित महिलेने आपल्या भावाकडे पुणे येथे जाऊन तक्रार दिली होती. त्यामुळे सासू व मुलाला अटकही झाली.


  9. महिला आमदाराच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकाची बदली
    केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पावसाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक सक्षम नसल्याने यांच्या बद्दल तक्रार केल्याने पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली.


  10. नागरिकांच्या स्वप्नातील पहिली रेल्वे आष्टी पर्यंत धावली
    भारत देश स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष 75 वर्षे झाली. मात्र अजूनही बीडला रेल्वे बीड जिल्ह्यात रेल्वे पोहोचली नव्हती. मात्र 23 जून रोजी अहमदनगर ते आष्टीपर्यंत 66 किलोमीटर अंतर रेल्वे बीड जिल्ह्यात पोहोचली आणि बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनीकांच्या आनंदाना पारावर राहिला नाही.बीडमधील नागरिक रेल्वेचा प्रवास करण्यासाठी आनंदाने सज्ज झाले होते.
    Look Back 2022
    नवीन ट्रेनचे थाटात स्वागत करताना प्रवासी



  11. बिल्कीस बानुच्या मारेकऱ्यांना सोडल्याच्या निषेधार्थ मोर्चा
    या मोर्चात मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांसह हिंदू महिलांनीही सहभाग नोंदवला होता. हा मोर्चा एक ऐतिहासिक मोर्चा म्हणून या मोर्चा बीड जिल्ह्यामध्ये पाहिले जात आहे.


  12. शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी सर्वांत मोठा मोर्चा
    बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळावा यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वांत मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. त्यात जवळपास दहा हजार शेतकरी सामील झाले होते.
    Look Back 2022
    आंदोेलन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.