ETV Bharat / state

परळीत कोविड लसीकरण सरावफेरीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुरूवात

author img

By

Published : Jan 8, 2021, 7:00 PM IST

बीड जिल्ह्यातील कोविड लसीकरण सरावाला बीड जिल्ह्यातील परळीत सुरूवात झाली. सराव फेरीचा आरंभ पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Guardian Minister Dhananjay Munde inaugurated the practice of covid vaccination in Parli
परळीत कोविड लसीकरण सरावफेरीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुरूवात

बीड - जिल्ह्यातील कोविड लसीकरण सरावफेरीला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी उपजिल्हा रुग्णालयात आरंभ करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समजून घेत लसीकरणाचे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

परळीत कोविड लसीकरण सरावफेरीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुरूवात

यावेळी ना. मुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लसीकरण कक्षाची फीत कापून पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना सराव फेरी दरम्यान लस देण्यास आरंभ करण्यात आला. राज्यात आज ३० जिल्हे आणि २५ महानगपालिकांमध्ये लसीकरणाची सरावफेरी राबविण्यात येत आहे. लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामुग्री इत्यादी सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली असून, याची प्रत्यक्ष पाहणी आज मुंडे यांनी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. राधाकीसन पवार, डॉ. दिनेश कुरमे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. संजय कदम, डॉ. अर्षद आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लसीकरण केंद्रातील लस साठा, प्रतीक्षा कक्ष, लस दिल्यानंतर काही वेळ त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवले जाईल तो कक्ष या सर्व ठिकाणची मुंडेंनी पाहणी केली. डॉ. माले यांनी लसीकरण सराव फेरी व त्यानंतर राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेतील महत्वाच्या टप्प्यांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दीपकनाना देशमुख, डॉ. विनोद जगतकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

लसीकारणासाठी लोकांना प्रत्यक्ष आणणे, त्यांच्या मनातील भीती व गैरसमज दूर करून यशस्वी लसीकरण पार पाडणे हे आव्हान आरोग्य विभागासमोर असून, आरोग्य विभागाने पूर्वी कोरोनाचा जसा धैर्याने सामना केला त्याच प्रमाणे लसीकरणाचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.