ETV Bharat / state

Gram Panchayat Election 2022 : बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात ; केंद्रावर पडले ईव्हीएम मशीन बंद

author img

By

Published : Dec 18, 2022, 12:03 PM IST

आज बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली (Gram Panchayat Election Voting in Beed District) आहे. बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. जिल्ह्यात 12 हजार कर्मचारी एकूण मतदानाच्या प्रक्रियेत आहेत.

Gram Panchayat Election 2022
बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक मतदान

बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

बीड : बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली (Gram Panchayat Election in Beed District) आहे. गावखेड्यातील मतदार राजा मतदान केंद्राच्या दिशेने जाताना दिसत आहे. परळीत मुंडे-बहीण भावाची तर बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली (Gram Panchayat Election 2022) आहे. मतदानावेळी गेवराई तालुक्यातील धोंडराई, येथील बुथ क्रमांक ५ व बुथ क्रमांक २ येथील ईव्हिएम मशीन बंद पडल्याचे पाहायला मिळाले.



सरपंच बिनविरोध : बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यापैकी 33 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून जिल्ह्यातील 671 ग्रामपंचायतीसाठी आज 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. तर 47 गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर जिल्ह्यातील 323 मतदान केंद्र हे संवेदनशील असून 79 मतदान केंद्र हे अती संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील, अति संवेदनशील मतदान केंद्रात व्हिडीओ शूटिंगही केली जाणार (Gram Panchayat Election Voting in Beed District) आहे.


कोण बाजी मारणार : जिल्ह्यात 12 हजार कर्मचारी एकूण मतदानाच्या प्रक्रियेत आहेत. तर जिल्ह्यातील विविध भागात 3 हजार 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यात 2 हजार केंद्रांवरुन हे मतदान होत आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असे 3 हजार 782 अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर 12 हजार 260 कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. सर्वांनी शांततेत मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीत कोण बाजी मारणार, हे निकालानंतरच (Gram Panchayat Election Voting) कळेल.

ईव्हीएम मशीन बंद : गेवराई तालुक्यातील व बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे आज मतदान पार पडत असून प्रशासनाकडून याची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती. आज सकाळी 7.30 वाजेपासून सुरु झालेल्या मतदानावेळी, गेवराई तालुक्यातील धोंडराई, येथील बुथ क्रमांक ५ व बुथ क्रमांक २ येथील ईव्हिएम मशीन बंद पडल्याचे पाहायला मिळाले.

अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ : आंबील वडगाव मतदान केंद्र बॅलेट मशीन तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती मशीन तब्बल दीड तासानंतर सुरू झाली. सुरुवातीलाच मशीन बंद पडल्याने वरील तीनही बुथमध्ये दोन तास एकही मतदान झाले नव्हते. मात्र मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या केंद्राध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी हे मशीन दुरुस्ती करत होते. मात्र धोंडराई मांडुळा, अंबिलवडगाव येथील केंद्रावर दुसऱ्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदान अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. त्यामुळे मतदारांनाही ताटकळत उभे रहावे लागले. एक एक करत काही बुथवरील मशीन बंद पडत असल्याने मशीन बदलण्याची नामुष्की मतदान अधिकाऱ्यांवर आली आहे. तहसीलदार तसेच नायब तहसीलदार यांना फोन केला असता त्यांनी फोन घेण्यास टाळाटाळ केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.