ETV Bharat / state

Ahmedpur Road Accident: अहमदपूर रस्त्यावर चारचाकीची दुचाकीला धडक; बापलेक जागीच ठार

author img

By

Published : Jun 5, 2023, 8:05 PM IST

अहमदपूर रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये हा अपघात आज दुपारी 3 वाजता घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दुचाकीवर असलेले बापलेक जागीच ठार झाले आहेत.

Ahmedpur Road Accident
बापलेक जागीच ठार

अपघात स्थळीचे भीषण दृष्य

बीड: बीडच्या नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे बीडवरून गावाकडे निघाले होते. नेकनूर पासून काही अंतरावर असणाऱ्या गुलाम सागर तलावाजवळ चारचाकी गाडी (क्रमांक MH- 17 V 9697) तसेच विनायक चौरे यांची गाडी (क्रमांक MH- 20 CN4015) व होंडा शाईन क्रमांक (MH- 23 AZ 5810) यांचा भीषण अपघात झाला.

बापलेक ठार: अपघातात बापलेक जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दुचाकीवर असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय नेकनूर येथे उपचार सुरू आहेत.

पोलीस निरीक्षकाने लहान मुलांना कारने उडविले: कारवरील नियंत्रण सुटल्याने मद्यधुंद अवस्थेतील पोलीस निरीक्षकाने दोन लहान मुलांना आपल्या कारने उडवल्याची घटना आज (सोमवारी) फलटणमधून समोर आली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी पोलीस निरीक्षकाला बेदम चोप देऊन कारच्या काचाही फोडल्या. सातारा जिल्ह्यात ही घटना घडली. जखमी मुलांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, घटनास्थळावरील व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांची गोची झाली आहे.

पोलीस निरीक्षक मद्यधुंद अवस्थेत: सातारा पोलीस मुख्यालयात बदली होऊन गेलेले पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार हे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास फलटणला आले होते. दत्तनगर भागातून जात असताना त्यांच्या कारने दोन बालकांना उडवले. घटनास्थळी जमलेल्या लोकांना त्यांच्या गाडीत मद्याची बाटली आढळली. तसेच पोलीस निरीक्षक मद्यधुंद अवस्थेत होते.

पोलीस निरीक्षकाला चोपले: घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांची कार थांबवली. तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. तसेच कारमध्ये मद्याच्या बाटल्या होत्या. त्यामुळे संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोपला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. इन्स्पेक्टरला मारहाण केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल: पोलीस निरीक्षक मद्यधुंद अवस्थेत असलेला आणि गाडीत मद्याची बाटली असणारा व्हिडिओ काढून नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे पोलीस निरीक्षकाला वाचविण्याची धडपड करणाऱ्या फलटण पोलिसांची गोची झाली. याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा:

  1. Odisha Train Accident : आता मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान, दिल्लीहून मदतीसाठी आली विशेष टीम
  2. Car Accident In Satara: दारुड्या पोलीस निरीक्षकाचा कारनामा; कारने दोन मुलांना उडवले
  3. Pune Crime : मुजोर रिक्षा चालकाने कहरच केला; प्रवाशाचा तोडला चक्क कान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.