ETV Bharat / state

विजेचा धक्का लागून मावशीसह भाचीचा जागीच मृत्यू; शिंदी गावावर शोककळा

author img

By

Published : Nov 7, 2019, 9:31 PM IST

एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्यामुळे शिंदी गावावर शोककळा पसरली आहे.

शिंदी गावावर शोककळा

बीड - अंगणामध्ये कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागल्याने मावशी आणि भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यामधील शिंदी येथे घडली. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्यामुळे शिंदी गावावर शोककळा पसरली आहे. रेणुका अशोक थोरात (वय 20, हमु.शिंदी, रा.खंडेश्वरी ता.कळंब जि.उस्मानाबाद) आणि अश्विनी भागवत जोगदंड (वय 15, रा.लोणगाव ता.माजलगाव जि.बीड) अशी अनुक्रमे मृत मावशी आणि भाचीचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, रेणुका थोरात या दिवाळीच्या सुट्या असल्याने माहेरी आल्या होत्या. घराबाहेरील अंगणामध्ये कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेजवळून घरातीलच एक वायर गेली होती. वायर काहीशी तुटून विद्युत प्रवाह तारेमध्ये उतरला होता. या तारेला हात लागल्याने रेणुका यांना विजेचा धक्का बसला. त्या अवस्थेत त्यांना पाहुन बाजूला असलेली त्यांच्या बहिणीची मुलगी अश्विनीने त्यांना पकडले. यात दोघींनाही विजेचा जोराचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सपोनि. मिसळे यांच्यासह बीट अमंलदार पो.हे. कॉ. बाळकृष्ण मुंडे, सोनवणे, मपोकॉ.चौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Intro:
दिवाळीसाठी माहेरी आलेल्या महिलेचा भाच्चीसह विजेच शॉक लागून मृत्यू

बीड- दिवाळीच्या सुट्ट्यासाठी माहेरी आलेल्या वीस वर्षीय महिलेचा तिच्या भाच्चीसह विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील शिंदी येथे घडली. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्यामुळे शिंदी गावावर शोककळा पसरली आहे.
रेणुका अशोक थोरात (वय 20, हमु.शिंदी, रा.खंडेश्वरी ता.कळंब जि.उस्मानाबाद), अश्विनी भागवत जोगदंड (वय 15, रा.लोणगाव ता.माजलगाव जि.बीड) अशी मयत मावशी व भाच्चीची नावे आहेत. रेणुका थोरात या दिवाळी च्या सुट्या असल्याने माहेरी आल्या होत्या. घराच्या अंगणामध्ये कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारीमध्ये घरातीलच एक वायर गेले होते. या तारेमध्ये वायर कट होवून विद्युत प्रवाह उतरला. या तारेला हात लागल्याने रेणुकास विजेचा धक्का बसल्याचे पाहून बाजुला असलेली त्यांच्या बहिणीची मुलगी अश्विनी  हिने त्यांना पकडले. यात दोघींचाही विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सपोनि.मिसळे यांच्यासह बीट अमंलदार पोहेकॉ.बाळकृष्ण मुंडे, सोनवणे, मपोकॉ.चौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली. 

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.