ETV Bharat / state

Sandeep Kshirsagar : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर वडीलांनी केला गुन्हा दाखल - Jayadutt Kshirsagar

आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अ दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांनी दाखल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे.

Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagar
author img

By

Published : April 12, 2023 at 3:56 PM IST

बीड : विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अ दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन रविंद्र क्षिरसागर यांच्यावर हा गुन्हा त्यांचेच वडील रवींद्र क्षीरसागर यांनी दाखल केला आहे. याची वास्तविक परिस्थिती अशी की संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढले आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे मद्य प्राशन करून घरात आले. तुमच्या बहिणीला का बोलवले असे म्हणत रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढण्याची तक्रार स्वतः रवींद्र क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. आ. संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध कलम 323, 504, 506, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

संदीप क्षीरसागर सतत चर्चेत : या नात्यामुळे बीड मतदारसंघातील आमदार संदीप क्षीरसागर सतत चर्चेत असतात. बीड मतदारसंघाचा विकास असो की बीड मतदारसंघातील रस्ते असो, कोणत्याही मुद्यांमुळे बीड मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात चर्चेत असलेले आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांची ओळख आहे. त्याचबरोबर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील काका-पुतण्याच्या वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे संदीप क्षीरसागर हे वादग्रस्त आमदार म्हणून ओळखले जातात, मात्र आज त्यांच्यात भांडण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कौटुंबिक वाद : त्यांचे वडील रवींद्र श्री सागर यांनी स्वतः बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आमदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार संदीप क्षीरसागर हे चर्चेत आले आहेत. हा वाद कौटुंबिक जरी असला तरी, यामध्ये दोन्ही मुलाविरुद्ध वडिलांनीच गुन्हा दाखल करणे हे कितपत योग्य आहे. मात्र, यामध्ये वडील रवींद्र क्षिरसागर त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यापासून ते सतत बेचैन असतात. त्याच बरोबर मुलांशी त्यांचा वाद झालाच कसा हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. कारण रवींद्र क्षिरसागर हे त्यांच्या मुलांवर अत्यंत प्रेम करतात. त्यांनी एवढी टोकाची भूमिका का घेतली असावी अशी चर्चा सर्वसामान्य होताना दिसत आहे.

हेही वाचा - Rajasthan first Vande Bharat Express: पंतप्रधान मोदींनी दाखवला राजस्थानच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा; 13 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.