ETV Bharat / state

Beed Farmer News : महात्मा फुले कर्जमुक्ती योजना; बीडमध्ये बँक अधिकाऱ्यांनीच केली शेतकऱ्यांची फसवणूक

author img

By

Published : Dec 28, 2022, 3:51 PM IST

Updated : Dec 28, 2022, 7:05 PM IST

राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत ( Mahatma Phule debt relief scheme ) नियमित कर्जफेड करण्याऱ्यांसाठी 50 हजार रूपये अनुदान देण्यात येते. मात्र, बीडमध्ये चौसाळा जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांची फसवणूक ( Bank officials cheated farmers ) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार शेतक-यांनी जिल्हाधिकारी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

Farmers Fraud
शेतकऱ्यांची फसवणूक

फसवणूक झालेले शेतकरी माहिती देताना


बीड : महाराष्ट्र शासनाने नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत ( Mahatma Phule debt relief scheme ) 50 हजार रूपये अनुदान खात्यावर जमा करण्यात येते. मात्र बँकेतील आधिकाऱ्यांनी संगनमतानेच परस्पर पैसे उचलुन शेतक-यांची आर्थिक फसवणूक ( Bank officials cheated farmers ) केल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित कारवाईसाठी बीड जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण : जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखा ता.जि.बीड या बँकेतील मौजे. गोलंग्री ता.जि.बीड येथील खातेदार शिवाजी प्रल्हाद कवडे, लक्ष्मण प्रल्हाद कवडे, बाळु दगडु पवार, वृंदावणी बाबासाहेब कदम, सुरेश बारीकराव कवडे यांच्या खात्यातमधून महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत ( Mahatma Phule debt relief scheme ) खात्यावर 50 हजार रूपये जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेज आले होते. परंतु यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान अज्ञात व्यक्तिने उचलल्याचे उघडकीस आले असून याविषयी बॅकेत विचारणा केल्यावर मॅनेजर यांनी उडवाउडवीची ( Bank officials cheated farmers in Beed ) उत्तरे दिली. अखेर आज लेखी तक्रार करण्यात आली.

दोषींवर कारवाईची मागणी : जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेमध्ये अनागोंदी कारभार असुन याबद्दल शेतक-यांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी असुन अशा प्रकारचा अपहार अनेक गावांत घडला असण्याची शक्यता असुन त्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत वेगवेगळे घोटाळे आपल्याला पाहायला मिळतात मात्र हा जो घोटाळा आहे तो नवीन घोटाळा आहे. दुष्काळामुळे शेतकरी एकीकडे नागावला आहे तर मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या हजाराच्या वर गेल्या आहेत, आणि जे शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांना शासनाने महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा केले. तू या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले पैसे झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना आला. मात्र ज्यावेळेस बँकेत गेले त्यावेळेस, पैसे मिळाले नाही आणि संबंधित चौसाळा जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्या ठिकाणी असलेल्या मॅनेजरची शेतकऱ्यांनी संपर्क केला तर आज उद्या आज उद्या अशी उत्तर दिली, मनापासून त्या मी चकरा मारल्या गेल्या तीन दिवसापासून बँक मॅनेजर ने त्यांना चक्क नकार दिला की आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, ज्यावेळेस आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली व त्यांनी संबंधित शेतकऱ्याची बाजू ऐकून घेत नेकनूर पोलीस स्टेशनला चौकशी करण्याचे आदेश देऊन संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकऱ्या विषयी असा प्रकार आम्ही खपवून घेणार नाहीत, असे नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

न्याय मिळण्याची मागणी : आम्ही कर्च घेणारे शेतकरी आहोत. दरवर्षी आम्ही वेळेत कर्जफेड करतो. त्यामुळे शासनाने आम्हाला 50 हजार रुपये अनुदान दिले होते. अनुदान आमच्या खात्यावरून गायब झाले, आम्ही ज्यावेळेस बँकेत पैसे आणण्यासाठी गेलो त्यावेळेस आमच्या खात्यावर पैसे नव्हते. बॅंक अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. यामुळे आमचे पैसे आम्हाला मिळावेत व आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची मागणी शेतकरी शिवाजी कवडे यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 28, 2022, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.