ETV Bharat / state

Doctors Accident Death: उतारावर अनियंत्रित कार झाडावर आदळली; दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 9, 2023, 4:30 PM IST

अंबेजोगाई येथून धारूरकडे निघालेल्या दोन डॉक्टरांचा अपघात झाला असून यामध्ये दोन्हीही तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी एक वाजता घडली. हे दोन्हीही डॉक्टर आडस जवळ आल्यानंतर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.

Doctors Accident Death
डॉक्टरचा अपघात

बीड : मृत डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही फिजिओथेरपी स्पेशालिस्ट होते. हे दोन्हीही डॉक्टर आडस येथील एका आरोग्य शिबिराला भेट देऊन कारमधून अंबेजोगाईकडे निघाले होते. गाडी क्रमांक (MH 44 S-39 83) चे आडस ते चेन्नई रोडवरील उतारावर नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात दोन्ही डॉक्टर मरण पावले. या वृत्ताने अंबेजोगाई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यामुळे होतात अपघात : बीड जिल्ह्यात दररोज विविध कारणाने अपघात होताना पाहायला मिळतात. या अपघातात अनेकजण मृत्यूमुखी पडल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक वाहन चालकांनी आपली वाहने नियंत्रित वेगात चालवली तर अपघात होत नाहीत; आपण अनेकवेळा पाहत आहोत की दुचाकी चालक असेल किंवा चारचाकी चालक अनेकदा वाहन सुसाट वेगाने चालवतात. त्यामुळेही वाहनावर चालकाचे नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अपघाताला निमंत्रण दिले जाते. यासाठी प्रत्येक दुचाकी असेल किंवा चारचाकी चालक त्यांनी आपले वाहन सुरक्षित व कमी वेगाने चालवावे. चारचाकी चालकांनी सीट बेल्ट लावावे. त्याचबरोबर दुचाकी चालकाने हेल्मेट घालावे, असे आव्हान अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून केले जाते. मात्र या नियमांचे नागरिक पालन करत नसल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

डॉक्टरच्या कारचा अपघात: भरधाव वेगात येणाऱ्या कारला अपघात झाल्याची घटना 13 मार्च, 2020 रोजी अमरावती जिल्ह्यातील वलगाव मार्गावर रिंग रोडलगत घडली. यामध्ये एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून, ५ डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. सुधीर अडगोकार असे अपघातात ठार झालेल्या डॉक्टरचे नाव असून, ते पथ्रोड येथील रहिवासी आहेत.

असा घडला अपघात: अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात महत्त्वाच्या कामानिमित्त डॉक्टर सुधीर अडगोकर हे पाथरूड येथील सहकारी डॉ. प्रभाकर तारे, डॉ. विष्णूनाथ कविटकर, डॉ. संजय तिखीले, डॉ. विलास कविटकर आणि डॉक्टर घनश्याम यांच्यासोबत कारने गुरुवारी दुपारी अमरावतीला येत होते. यावेळी वलगाव ओलांडल्यावर अमरावती शहराजवळ आले असतानाच रिंग रोडवर भरधाव वेगात असणारी कार अचानक पलटली. या भीषण अपघातात डॉ. सुधीर अडगोकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ५ डॉक्टर गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या सर्व डॉक्टरांना अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा:

  1. Kolhapur robbery: कोल्हापुरातील कत्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांचा गोळीबार, 2 कोटींचे सोने लंपास
  2. Gang Rape Of Minor Girl: छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; चार अटकेत दोघे फरार, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश
  3. Sameer Wankhede Case: समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ? क्रुझ ड्रग पार्टीमध्ये मुंबई बेलाड पियर दंडाधिकारी यांचा सहभाग- न्यायालयात गौफ्यस्फोट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.