ETV Bharat / state

दिवाळी बोनस न दिल्याने कामगाराने पाडले मालकाचे दात

author img

By

Published : Oct 28, 2019, 5:43 PM IST

Updated : Oct 28, 2019, 7:48 PM IST

दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणून एका कामगाराने 50 वर्षीय लेबर काँट्रॅक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये काँट्रॅक्टरचे दात पाडले आहेत.

कामगाराने मालकाचे पाडले दात

औरंगाबाद - दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणून एका कामगाराने 50 वर्षीय लेबर काँट्रॅक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये काँट्रॅक्टरचे दात पाडले आहेत. या प्रकरणी बाळू पठारे (मारहाण करणारा कामगार, रा.गांधीनगर, ब्रिजवाडी) याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

दिवाळी बोनस न दिल्याने कामगाराने मालकाचे पाडले दात, गुन्हा दाखल

चिकलठाणा एमआयडीसी भागातील उत्तरानगर भागात ही घटना घडली. भीमा चंद्रदेव जोशी (वय - 50, रा.लेबर कॉलोनी), असे जखमी मालकाचे नाव आहे. दिवाळीच्या काळात कामगारांना बोनस देण्याची प्रथा आहे. मालकाकडून स्वखुशीने कामगारांना बोनस दिला जातो. आरोपी बाळूने देखील जोशी यांना बोनसची मागणी केली होती. मात्र, जोशी यांनी आता नाही नंतर बोनस देतो, असे म्हटल्याने बाळूला राग आला. राग अनावर झाल्याने त्याने जोशींना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तोंडावर जोराचा ठोसा मारला. यामध्ये जोशी यांचे दात पडले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणून एका कामगाराने 50 वर्षीय लेबर काँट्रॅकटरला चांगलेच बदडत दात पाडल्याची घटना चिकलठाणा एमआयडीसी भागातील उत्तरानागरीत घडली.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू पठारे (रा.गांधीनगर, ब्रिजवाडी) असे मालकाचे दात पाडणाऱ्या कामगारांचे नाव आहे. तर भीमा चंद्रदेव जोशी वय-50 (रा.लेबर कॉलोनी) असे जखमी मालकाचे नाव आहे.


Body:दिवाळीच्या काळात कामगारांना बोनस देण्याची प्रथा आहे. मालकाकडून स्वखुशीने कामगारांना बोनस दिला जातो. आरोपी बाडू ने देखील जोशी यांना बोनस ची मागणी केली मात्र जोशी यांनी आता नाहीत नंतर बोनस देतो असे म्हणतात बाडू ला राग अनावर झाला व त्याने जोशी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. व त्यांच्या तोंडावर जोराचा ठोसा मारला यामध्ये जोशी यांचे दात पडले. या प्रकरणी एम आयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:
Last Updated : Oct 28, 2019, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.