ETV Bharat / state

Rakesh Tikait in Aurangabad : राकेश टिकैत यांचे नव्या आंदोलनाचे संकेत

author img

By

Published : Apr 12, 2022, 5:02 PM IST

Updated : Apr 12, 2022, 6:31 PM IST

काश्मीर फाईल्स चित्रपट हा चित्रपट नसून तो प्रचार आहे. स्वतः पंतप्रधान त्या चित्रपटाचे कौतूक करत आहेत. 20-25 कोटी लोकांना आता तुम्ही हाकलून देणार आहात का?, असा प्रश्न राकेश टिकैत ( Rakesh Tikait on Kashmir Files ) यांनी उपस्थित केला.

राकेश टिकैत
राकेश टिकैत

औरंगाबाद - देशातील तीन काळे कायदे तेरा महिन्यात रद्द झाले. हमीभाव कायद्याबाबात अनेक चर्चा झाल्या मात्र, याबाबत कोणताही कायदा अद्याप आणला नाही. हमीभाव कायद्यासाठी मोठ्या लढाईची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारण्यासाठी संघर्ष करावे लागणार आहे, असे म्हणत नव्या आंदोलनाच्या तयारी संकेत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी औरंगाबादेत दिले.

बोलताना राकेश टिकैत

आता लढा भाकरीसाठी - देशात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना शेतीपासून दूर नेत त्यांना मजूर करण्याचा डाव सुरू आहे. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात खाण्यायोग्य काही पिकणार नाही. सर्व बाहेरुन आणायचे, धान्यावर मालकी मिळवायची आणि मजुरांना भूक लागली की अन्नधान्याच्या किंमती ठरवायच्या, असा प्रयत्न या कंत्राटी शेतीमुळे होणार आहे. त्यामुळे आता भाकरीसाठीही लढा उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी शेतकऱ्यांसोबतच युवावर्गाचीही साथ तितकीच महत्त्वाची आहे, असेही टिकैत म्हणाले.

25 कोटी लोकांना तुम्ही हाकलून देणार का..? - Kashmir Files चित्रपट हा चित्रपट नसून तो प्रचार आहे. स्वतः पंतप्रधान त्या चित्रपटाचे कौतूक करत आहेत. 20-25 कोटी लोकांना आता तुम्ही हाकलून देणार आहात का?, असा प्रश्नही टिकैत यांनी ( Rakesh Tikait on Kashmir Files ) उपस्थित केला.

हेही वाचा - नवरदेवाला गंडविणाऱ्या टोळीची सदस्या जेरबंद, बनावट लग्न लावून अनेकांना फसवले

Last Updated : Apr 12, 2022, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.