ETV Bharat / state

Aditya Thackeray Assembly Stone Pelting : आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत दगडफेक नाही; पोलिसांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Feb 8, 2023, 5:50 PM IST

युवासेना आदित्य ठाकरे यांच्या सभेत दगडफेक झालीच नाही, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. सभा सुरू असताना त्याच वेळी असलेली मिरवणूक त्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आदित्य ठाकरे यांची पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था सज्ज होती. सभेत कुठलीही दगडफेक झाली नसून, फक्त डीजे सुरू ठेवण्यावरून काही मुलांनी थोडा गोंधळ घातला.

No Stone Pelting in Aditya Thackerays Rally in Aurangabad Police Explanation
दित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत दगडफेक नाही; पोलिसांचे स्पष्टीकरण

आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत दगडफेक नाही; पोलिसांचे स्पष्टीकरण

औरंगाबाद : या सभेमध्ये या व्यतिरिक्त कुठलाही अनुचित प्रकार नाही, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली. येथे कोणतीही दगडफेक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. विधान परिषदेत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेत दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

विरोधी पक्ष नेत्याने दिले पत्र : या प्रकरणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पोलीस महासंचालकाना पत्र लिहून तक्रार केली. या पत्रात आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त करीत सुरक्षेत कसूर झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष देण्याच्या दिल्या सूचना करण्यात आल्या आहेत. सात फेब्रुवारीच्या संध्याकाळी वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भाषण करीत होते, त्यावेळी अचानक काही दगड व्यासपीठाकडे आले.

आदित्य ठाकरेंच्या सभेवर तसेच वाहनावर दगडफेक : दगडफेक होताच खैरे यांनी आपला भाषण आटोपते घेत आदित्य ठाकरे हे भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त काही लोकांनी मिरवणूक काढली होती. त्यात डीजे लावण्यात आला होता. सभा सुरू असल्याने पोलिसांनी डीजे बंद करायला सांगितल्याने काही लोकांनी सभेच्या दिशेने दगड फिरकवली, इतकच नाही तर सभा आटपून आदित्य ठाकरे निघाले असता, त्यांच्या वाहनावरदेखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचे नेते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत, आदित्य ठाकरे यांना राज्यात सुरक्षा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.

दगडफेक झालीच नाही, पोलिसांचे स्पष्टीकरण : शिवसेनेचे नेते दगडफेक झाले असल्याचे सांगत पोलीस प्रशासन यांच्यावर सुरक्षा व्यवस्था चांगली नसल्याचा आरोप करीत असताना, पोलीस विभागाने दगडफेक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. दगडफेक झाली असती तर कोणीतरी जखमी झाले असते, मात्र तसे झाले नाही. रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजित रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी सुरू असलेला डिजे बंद करण्यावरून काही युवकांनी गोंधळ घातला. मात्र, त्यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वतः डीजे सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे वाद नव्हता. त्यामुळे दगडफेक झाली नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक यांना दिलेल्या पत्राबद्दल माहिती नाही. मात्र, त्यांना उत्तर देऊ, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.

हेही वाचा : Aaditya Thackeray Convoy : औरंगाबादजवळ आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.