ETV Bharat / state

Samruddhi Highway: भाजपला घरचा आहेर! समृद्धी महामार्गासाठी बेकायदा उत्खनन, बागडे यांची चौकशीची मागणी

author img

By

Published : Dec 19, 2022, 8:19 PM IST

Updated : Dec 19, 2022, 11:02 PM IST

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या बांधकामादरम्यान किमान 80 ते 90 एकर जमीन बेकायदेशीरपणे खोदण्यात आली, असा दावा भाजप आमदार हरिभाऊ बागडे ( MLA Haribhau Bagle ) यांनी केला आहे. त्यांच्या मतदार संघात फुलंब्री येथे सुरू असलेल्या अवैध खोदाईबाबत ( MLA Haribhau Bagle on Samriddhi Highway ) त्यांनी प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

Samruddhi Highway
समृद्धी महामार्ग

औरंगाबाद : अवघ्या आठवडा भरात कोट्यवधीचा टोल वसुली करणाऱ्या समृध्दी महामार्गाच्या ( Samrudhhi Mahamarg ) कामाबाबत भाजप आमदारांनी तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पात आमदार हरिभाऊ बागडे यांच्या कारखान्याला कोट्यावधींची गौण खजिना चोरल्याचा आरोप ( MLA Haribhau Bagle on Samriddhi Highway ) त्यांनी केला आहे. औरंगाबादच्या हर्सूल सावंगी येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील कोट्यवधी रुपयांच्या मुरूम, दगड, माती या गौण खनिजाचा महामार्गासाठी चोरून वापर केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे ( MLA Haribhau Bagle ) यांनी केला आहे.

चौकशीची मागणी : फुलंब्रीतील सावंगी येथे देवगिरी सहकारी साखर कारखान्याची सुमारे 135 एकर जमीन आहे. मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी 20 एकर जमीन संपादित करण्यात आली असताना, उर्वरित जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले असून ती अस्तर ठेवण्यात आली आहे, असे बागडे यांनी पत्रकारांना सांगितले. बेकायदेशीर खोदकामाची जिल्हाधिकारी व प्रशासनाने चौकशी करून जमीन मालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी हरिभाऊ बागळे यांनी केली आहे. जवळपास 80-90 एकर जागेत बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले होते. उत्खनन केलेली माती एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी किंवा इतरत्र वापरली गेली होती का, हे अधिकाऱ्यांनी शोधले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

गौण खजिना चोरीला : हर्सूल सावंगी येथे देवगिरी सहकारी साखर कारखान्याने गट नबर 41, 43, 44, 46, 47 आणि 54 भूखंड घेतला आहे. जवळपास 54 हेक्टर ही जमीन आहे. त्यातील 20 एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आणि त्याचे 27 कोटी रुपये देखील कारखान्याला मिळाले. मात्र उर्वरित जमिनीवरून गौण खनिजाचा वापर करण्यात आला. त्याचा समृद्धी महामार्गासाठी वापर झाला की आणखी कुठे नेण्यात आला याची माहिती नाही. सगळी जमीन खोदून टाकली आहे. तर सप्टेंबर 2021 ला याबाबत आमच्या लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देखील केली होती. मात्र पुढे त्याबद्दल कोणतेही कारवाई झाला नसल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे.

बागडेंनी पाहणी करत केला आरोप : समृध्दी महामार्गाची कारखान्याच्या जमिनीवर ठेकेदारांनी सर्रास डल्ला मारल्याचा आरोप कारखान्याच्या सदस्यांनी केला. त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी जमिनीवर सर्वत्र खड्डे पडलेले आढळून आले. त्यामुळे जवळपास 80 ते 90 एकर जमीन पूर्णपणे खराब झाली आहे. हर्सूल सावंगी भागातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील कोट्यवधी रुपयांच्या मुरूम, दगड, माती या गौण खनिजाची चोरी झाल्याचा आरोप भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी चोरी गेलेल्या गौण खनिजाबाबत पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच याबाबत कारवाई करण्याची मागणी देखील केली.



मोबदला देण्याची मागणी : आठवडाभराआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे उद्घाटन केले. भाजपने जोरदार प्रचार यावेळी करण्यात आला. मात्र याच मार्गासाठी गौण खजिना मोबदला न देता वापरल्याचा आरोप करत हरिभाऊ बागडे यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत सावंगी येथील समृध्दी महामार्गालगत असलेल्या कारखान्याच्या जमिनीची पाहणी केली. यावेळी खोदून ठेवलेल्या मुरुमाचा मोबदला साखर कारखान्याला मिळाला पाहिजे. आणि खोदून ठेवलेल्या जमिनीचं सपाटीकरण करून देण्यात द्यावा यासह जिल्हाधिकारी आणि शासनाने या प्रकरणात लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Last Updated :Dec 19, 2022, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.