ETV Bharat / state

Life Threatening Journey : ग्रामीण भागात शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा प्रवास, एका जीपमध्ये कोंबतात ३०-५० मुली?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 4:25 PM IST

Updated : Oct 11, 2023, 6:27 PM IST

Students Face Bus Problems: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोना, आडगाव, पिंपळगाव, मसला, रेल, वाहेगाव येथील विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकत आहेत. विद्यार्थिनींना जीपच्या छतावर बसून शाळेत जाण्यासाठी रोज कसरत (Journey of School Girl Students) करावी लागते. एका जीपमध्ये ३० ते ५० मुलींना कोंबलं जातं अशी चर्चा आहे.

Students Face Bus Problems
मुलींचा जीवघेणा प्रवा

ग्रामीण भागात शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा प्रवास

छत्रपती संभाजीनगर Students Face Bus Problems : मुलींच्या शिक्षणाचा स्तर सुधारावा यासाठी सरकारने घोषणा केली. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास (Journey of School Girl Students) करावा लागत आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोना, आडगाव, पिंपळगाव, मसला, गावांमधे विदारक चित्र पाहायला मिळतंय. दोनशे मुलींना एकाच बसमध्ये किंवा जीपच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो. तर घरी जाताना आठ ते नऊ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्यानं ग्रामीण भागात शिक्षण किती जिकरीचं झालंय याचा प्रत्यय येतो. जीवघेण्या प्रवास बाबत सांगताना विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. एकीकडे सकारात्मक सरकारी घोषणा तर दुसरीकडे विदारक चित्र असल्यानं शिक्षणाचा स्तर खरंच सुधारतोय का? हा प्रश्न निर्माण होतो. एका जीपमध्ये ३० ते ५० मुलींना कोंबलं जातं अशी चर्चा आहे.



विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन करतात प्रवास : ग्रामीण भागात आजही शिक्षणाची म्हणावी तशी व्यवस्था नाही. जिल्हा परिषद शाळांची उपलब्धता असली तरी तिथे फक्त सातवी वर्गापर्यंत शिक्षण उपलब्ध होते. पुढील शिक्षणासाठी मात्र जिथे सुविधा असेल त्या गावी जावं लागतं. अशीच परिस्थिती ग्रामीण भागातील बहुतांश तालुक्यांमध्ये पाहायला मिळेल, यात काही नविन नाही. मात्र शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. फुलंब्री तालुक्यातील निधोना, आडगाव, पिंपळगाव, मसला, रेल, वाहेगाव येथे विद्यार्थिनींना जीवमुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. संभाजीनगर-पिशोर या एकाच बसला एकाच वेळी दोनशे मुलांना शाळेत घेऊन जावं लागत आहे. याआधी बाबरा मार्गाची बस सुरू असल्याने अडचण येत नव्हती. मात्र राज्य परिवहन विभागाने अचानक ती बस बंद (Bus Band) केल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागतं आहे.



बसमध्ये विद्यार्थ्यांना जागा राहात नाही : विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी असलेली बाबराकडे जाणारी बस अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे शाळेच्या वेळी पिशोरकडे जाणाऱ्या बसचा आधार मिळाला. मात्र त्यात अनेक प्रवासी आधीच प्रवास करत असतात. त्यात महिलांना अर्धे तिकीट करण्यात आल्यानं बसमध्ये महिलांची गर्दी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे वेळेवर बस येऊनही त्यात जागा मिळवणे विद्यार्थ्यांना अडचणीचे जाते. अवघे पन्नास ते साठ प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असणाऱ्या बसमध्ये आधीचे प्रवासी आणि दीडशे मुली शाळेत सोडण्याची वेळ येते. त्यामुळे विद्यार्थिनींना अक्षरशः एकमेकांच्या अंगावर बसून प्रवास करावा लागतोय. बसमधे जागा मिळाली नाही तर ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पीली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीपच्या छतावरही बसून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास धोकादायक असला तरी शिक्षण घेण्यासाठी करावा लागतो. मात्र या अडचणींमुळे अभ्यास करायला वेळ मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी भावना मुलींनी व्यक्त केली.



घरी येण्यास होतो उशीर : अनंत अडचणींचा सामना केल्यावर शाळेत आलेल्या मुलींना घरी जाताना मात्र अक्षरशः पायी जावं लागतं. शाळा सुटल्यावर वाहन उपलब्ध झालं नाही तर पायी घर गाठावं लागतं. दिवसभर शाळेत अभ्यास करून दमलेल्या अवस्थेत आठ ते नऊ किलोमीटरचा प्रवास चालत करावा लागतो. त्यामधे मद्यपी देखील येता जाता टोमणा देत त्रास देतात. त्यामुळे काही वेळा भीती वाटत असल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली. तर मुली घरी येईपर्यंत आई वडिलांना चिंता असते ती वेगळीच. त्यामुळे तातडीने बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थिनी आणि पालकांनी व्यक्त केली. एकीकडे शिक्षणिक धोरण चांगलं करण्याच्या वल्गना करणारे सरकार या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होतोय.


हेही वाचा -

ZP Students Letter to CM : टपाल दिनानिमित्त शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घातलं साकडं...

School Adoption Scheme: दत्तक योजनेतून 65 हजार सरकारी शाळांना कंपन्यांचे नाव, शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर

Nagpur ZP School : नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा; सत्ताधाऱ्यांनो सांगा, विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे?

Last Updated : Oct 11, 2023, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.