ETV Bharat / state

Dry Fruits Theft: चोरट्यांचा चक्क सुक्या मेव्यावरच डल्ला; 18 हजारांचा माल लंपास

author img

By

Published : Jun 1, 2023, 10:39 PM IST

Dry Fruits Theft
चोरीचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद

चोरीच्या अनेक घटना घडत असतात. कधी सोनं तर कधी पैशांची चोरी केली जाते. मात्र, शहरात झालेली एक चोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, यात कोणत्या मौल्यवान वस्तूंची नाही तर चक्क सुक्या मेव्याची चोरी झाली आहे. शहागंज भागात झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी 16 किलो काजू आणि दहा किलो बदामावर हात साफ केला. हा सर्व प्रकार 'सीसीटीव्ही'मध्ये कैद झाला आहे.

चोरीचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): या प्रकारात दुकानदार मोहम्मद अब्दुल सलाम सकाळी दहा वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे वरचे पत्रे उचकटलेले दिसले. दुकानात जाऊन पाहणी केली असता काजूची व बदामांची पाकिटे कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी केली असता एकूण 18 हजार 450 रुपयांचे काजू व बदामावर चोरट्याने ताव मारल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.


सर्वत्र चोरीची चर्चा: शहरात कुठे ना कुठे रोज चोरीच्या घटना होत असतात. कधी ऑटोमोबाईलचे दुकान तर कधी सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी झाल्याचे नेहमीच वाचण्यात येते. त्याचे सीसीटीव्ही पण समोर येतात. मात्र, शहागंज भागात झालेल्या या चोरीचा 'सीसीटीव्ही' सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय झाला आहे.

वाईन शॉपमध्ये चोरी: एकाच रात्री दिंडोरी रोडवरील म्हसरूळ हद्दीतील अमित वाईन शॉप तसेच दिंडोरी लिकर या दोन वाईन शॉपवर लाखो रुपयांचा मद्यावर डल्ला मारला आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अज्ञात चोरट्याने दोनही वाईन शॉप मिळून एकूण सात लाख पंचेचाळीस हजार रुपये लंपास केले आहे.

सात लाख पंचेचाळीस हजार रुपये लंपास: दिंडोरी रोड मुख्य रस्त्यालगत अमित वाईन व दिंडोरी लीकर असे दोन वाईन शॉप आहेत. या दोन ही वाईन शॉपमध्ये देशी व विदेशी मद्य विक्री होते. नित्य क्रमाने दोनही वाईन शॉप हे आपले कामकाज उरकून आस्थापनावेळी बंद करून घरी परतले होते. ३१ डिसेंबर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दिंडोरी रोडवरील शॉप नं .२ येथील अमित वाईन सुमारे ३.४५ ते ४.३० वाजता दुकानात प्रवेश केला. त्यांनी जवळपास सहा लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. दिंडोरी लिकर हे देखील आस्थापना बंद केल्यानंतर ६० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. चोरांची कृत्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहे.

हेही वाचा:

  1. Porn Video Case : संतापजनक! उद्यानात खेळायला आलेल्या अल्पवयीन मुलींना 'पॉर्न व्हिडिओ' दाखविला; विकृताला...
  2. Narcotics Seized In Pune : 'उडता पंजाब' नंतर आता 'उडता पुणे'; 5 महिन्यात 'एवढ्या कोटीचे' अंमली पदार्थ जप्त
  3. Pune Crime : फक्त प्रसिद्धीसाठी तोतया IAS अधिकारी जायचा विविध कार्यक्रमांना; जाणून घ्या काय आहे प्रकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.