ETV Bharat / state

Drugs Factory burst : छत्रपती संभाजीनगर बनतंय 'ड्रग्ज कॅपीटल?' कारखान्यातून 160 कोटींचे अमली पदार्थ डीआरआयकडून  जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 9:49 AM IST

Updated : Oct 30, 2023, 12:30 PM IST

Drugs Factory burst: छत्रपती संभाजीनगरात पुन्हा एकदा 160 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. त्यापूर्वीच मागील आठवड्यात तब्बल 250 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Drugs Factory burst
Drugs Factory burst

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Drugs Factory burst : छत्रपती संभाजीनगरात मागील आठवड्यात अडीचशे कोटींचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाकडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आलीय. पैठण येथील एका कारखान्यातून 160 कोटींचे अमली पदार्थ जप्त करत दोन जणांना अटक केल्याची माहिती रविवारी रात्री उशिरा डीआरआय विभागाकडून देण्यात आली.

डीआरआयकडून कारवाईत अटक केलेला जितेशकुमार हन्होरीया याची चौकशी करत असताना तपास अधिकाऱ्यांना पैठणीतील ॲपेक्स मेडिकेम या कंपनीची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी दिवसभर कारवाई करण्यात आली. यात सौरभ गोंधळेकर आणि शेखर पगार यांना अटक करण्यात आली. त्यामुळं शहरात अंमली पदार्थाचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरल्याचं समोर आलंय.

सलग दुसरी मोठी कारवाई : पैठण औद्योगिक वसाहतीत असलेल्या महालक्ष्मी केमिकल कंपनीवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली होती. त्यात जितेश कुमारच्या घरातून अडीचशे कोटी रुपये किमतीचं मेफेड्रोन फेटामाईन ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. त्यावेळी अटक केलेल्या जितेश कुमार आणि शंकर कुमावत यांना अटक करून त्याची चौकशी सुरु करण्यात आली होती.

कारवाईनंतर कंपनी सील- मुख्य आरोपी असलेला जितेश कुमारनं महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांना महत्त्वाची दिली. त्यावरून त्याच्या संपर्कात असलेल्या ॲपेक्स मेडिकेम या कंपनीवर कारवाई करण्यात आली. यात 107 लिटर मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. कारवाईनंतर ही कंपनी सील करण्यात आली. पहिल्या कारवाईतील जितेश कुमार हा या कंपनीचा सल्लागार म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या कंपनीचे संचालक सौरभ गोंधळेकर आणि व्यवस्थापक शेखर पगार यांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यांच्यावर सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

केमिकल ज्ञान नाही, गोंधळेकर याचा दावा : रविवारी दिवसभर पैठण औद्योगिक वसाहत इथं असलेल्या ॲपेक्स मेडिक्लेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्लांटवर महसूल गुप्तचर संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली. त्यावेळी कंपनीत 160 कोटींचे एमटी ड्रग्स आढळून आले. याबाबत विचारणा केली असता कंपनीचे संचालक सौरभ गोंधळेकर यांनी नेमकं केमिकल कोणतं आहे, याबाबत ज्ञान नसल्याचा दावा केला. मात्र जितेश कुमार याच्याशी भेट झाल्यावर केमिकल कंपनी स्थापन केल्याचं सांगितलं. मात्र, यात काय तयार होतं याबाबत आपल्याला माहिती नाही. कोणतं केमिकल असतात याचाही ज्ञान नाही, असं उत्तर सौरभ गोंधळेकर यांनी दिलं. मात्र, त्यावर महसूल गुप्तचर संचालनाच्या अधिकाऱ्यांनी सौरभ याला आपण दोषी आहात असं सांगत अटक केलीय.

हेही वाचा :

  1. Solapur drugs factory case : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई; सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी हैदराबादमधून एकाला अटक
  2. MD drugs seized : सोलापूरला पुन्हा ड्रग्जचा अड्डा ; ड्रग्ज डीलर छोटूच्या उत्तरप्रदेशातून आवळल्या मुसक्या, एक कोटींचं एमडी ड्रग्स जप्त
  3. ED Raid: १६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अशोक युनिर्व्हसिटीच्या संस्थापकांच्या संबंधित ठिकाणांवर छापेमारी
Last Updated : Oct 30, 2023, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.