ETV Bharat / state

कल्याण काळेंच्या पराभवाने औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

author img

By

Published : Oct 25, 2019, 8:08 PM IST

विधानसभा निवडणुकीचा कौल स्पष्टपणे युतीला मिळाला असून औरंगाबाद जिल्ह्यातून आघाडी आणि काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या पराभवाने जिल्ह्यातील काँग्रेस संपुष्टात आली का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कल्याण काळेंच्या पराभवाने औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीचा कौल स्पष्टपणे युतीला मिळाला असून औरंगाबाद जिल्ह्यातून आघाडी आणि काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या पराभवाने जिल्ह्यातील काँग्रेस संपुष्टात आली का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कल्याण काळेंच्या पराभवाने औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

हेही वाचा - नगरमध्ये हातकणंगले पॅटर्न : राम शिंदेंनी रोहित पवार यांना बांधला 'विजयी' फेटा

औरंगाबाद पूर्वची जागा काँग्रेसने समाजवादी पक्षाला सोडली. मात्र, समाजवादी पक्षासोबत झालेल्या वादामुळे आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी अपक्ष उमेदवार असलेल्या युसुफ मुकातीला आपला पाठिंबा जाहीर केला. पश्चिम मतदारसंघात रिपब्लिकन डेमोक्रॅटिक पक्षाला जागा दिली. मात्र, त्या ठिकाणी रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या आधीच काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली होती.

अब्दुल सत्तार यांच्यानंतर सिल्लोड येथे प्रभाकर पालोदकर याना मिळालेली उमेदवारी सोडून पालोदकर यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने काँग्रेसने नवख्या कैसर आझादला उमेदवारी दिली. त्यामुळे सर्व भिस्त होती ती फुलंब्रीचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर. मात्र, त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने ना कुठली प्रचारसभा घेतली ना कुठल्या बड्या नेत्याने रोड शो केला. एकट्या कल्याण काळेंच्या जीवावर लढलेली निवडणूक काँग्रेसला चांगलीच भोवली.

काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला जोर कमी पडला आणि राष्ट्रवादीने लढवलेल्या 5 जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच जागांवर युतीला जनादेश मिळाल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हद्दपार झाल्याच पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत याचा परिणाम होईल असा अंदाज राजकीय अभ्यासक सतीश रेंगे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 'कराड दक्षिण'वर पुन्हा पृथ्वी'राज'!

Intro:मराठवाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय. कारण मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांमधून काँग्रेस तर दोन जिल्ह्यातून राष्ट्रवादी हद्दपार झाली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांमधे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाला नाही त्यामुळे मराठवाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगलाच धक्का मतदारांनी दिल्याचं दिसून आलं.


Body:2014 च्या मानाने मराठवाड्यात कंग्रेसची एक जागा कमी झाली आहे. राष्ट्रवादीने 2014 मध्ये मराठवाड्यात आठ जागांवर विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीने मराठवाड्यात आठ जागांवर विजय मिळवला असला तरी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून मात्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र हद्दपार झाली आहे.


Conclusion:विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना - भाजपला महाजनादेश घेता आला नाही. मात्र मराठवाड्यात युतीच्या जागा वाढल्याचं पाहायला मिळालं.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 16, शिवसेना 12, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 8, इतरांना 2 जागांवर विजय मिळाला. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 15, शिवसेना 11, राष्ट्रवादी 8, काँग्रेस 9, तर इतरांना 3 जागांवर विजय मिळाला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात चांगलाच झटका बसला कारण या दोन जिल्ह्यांमध्ये या दोनही पक्षांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन जिल्ह्यांमधून दोन्ही पक्ष हद्दपार झाल्याच पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यात माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्या पराभवाने जिल्ह्यातील काँग्रेस संपुष्टात आली का? असा प्रश्न निर्माण झाला. औरंगाबाद पूर्वची जागा काँग्रेसने समाजवादी पक्षाला सोडली मात्र नंतर समाजवादी पक्षासोबत झालेल्या वादामुळे आघाडीत बिघाडी झाली आणि काँग्रेसने ऐनवेळी अपक्ष असलेल्या युसुफ मुकातीला आपला पाठिंबा जाहीर केला. पश्चिम मतदार संघात रिपब्लिकन डेमोक्रॅटिक पक्षाला जागा दिली मात्र त्या ठिकाणी रमेश गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या आधीच काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली होती. तर अब्दुल सत्तार यांच्यानंतर सिल्लोड येथे प्रभाकर पालोदकर याना मिळालेली उमेदवारी सोडून पालोदकर यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने काँग्रेसला नवख्या कैसर आझादला उमेदवारी दिली. त्यामुळे सर्व भिस्त होती ती फुलंब्रीचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर. मात्र त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने ना कुठली प्रचारसभा घेतली ना कुठल्या बड्या नेत्याने रोड शो केला. एकट्या कल्याण काळेंच्या जीवावर लढलेली निवडणूक काँग्रेसला चांगलीच भोवली. सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. तर दुसरी कडे राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला जोर कमी पडला आणि राष्ट्रवादीने लढवलेल्या 5 जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच जागांवर युतीला जनादेश मिळाल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हद्दपार झाल्याच पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत याचा परिणाम होईल असा अंदाज राजकीय अभ्यासक सतीश रेंगे यांनी व्यक्त केला आहे.
byte - सतीश रेंगे - राजकीय अभ्यासक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.