ETV Bharat / state

विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती! पैठण तालुक्यात अनेक नाराज कार्यकर्त्यांचे पक्षांतर

author img

By

Published : Oct 12, 2019, 5:58 PM IST

Updated : Oct 12, 2019, 7:13 PM IST

स्थानिक राजकारण समोर ठेवून गावागावात आता पक्षांतराचे वारे वाहताना दिसत आहे. पैठण तालुक्यात देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमेर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करताना कार्यकर्ते

औरंगाबाद - विधानसभेच्या निडणुकीआधी अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, खालच्या पातळीवर देखील कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीत उमेदवारांची साथ सोडल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक राजकारण समोर ठेवून गावागावात आता पक्षांतराचे वारे वाहताना दिसत आहे. पैठण तालुक्यात देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे.

पैठण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी पैठण शहरातून प्रचार रॅली काढली.

शहरापेक्षा ग्रामीण भागात सध्या उमेदवाराच्या प्रचार बैठका, सभातून विकासाचा जाहीरनामा सक्षमपणे मतदारापुढे न मांडता विधानसभेचे उमेदवार एकमेकांचे उणे दुणे काढत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात विधानसभेच्या अनुशंगाने मनोरंजनाचे कार्यक्रम असल्यासारखे वाटु लागल्याने, गटातटातील निष्ठावान लोक आता पक्ष बदलू लागले आहेत.

gorde during campaign
राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता गोर्डे प्रचार करताना

हेही वाचा - औरंगाबाद शहराच्या नावाला हात लावला तर याद राखा - अबू आझमी

नुकत्याच झालेल्या आपेगाव येथील राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यक्रमात माजी सरपंच आशोक औटे, भरत औटे यांच्यासह बऱ्याच कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत धनुष्य सोडून घड्याळ हाती बांधली आहे. त्यामुळे आता स्थानिक राजकारणातही बदलाचे वारे दिसून आले. तर नांदर येथील राष्ट्रवादीचे कट्टर नेते रेवन कर्डीले व मच्छींद्र मिसाळसह अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने खांदेपालपालटाच्या चर्चेला उधाण येत आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये काँग्रेसला झटका; पश्चिम मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाडांचा अर्ज बाद

कोणी पाण्याच्या मुद्द्यावर तर कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकमेकांवर आरोप करत पक्षांतर करत आहेत. त्यामुळे मतदारांना कोणता कार्यकर्ता कोणाचा प्रचार करतोय हे कळायला मार्ग नाही. अशा परिस्थितीत आता उमेदवारांना नेमके आपल्या सोबत कोण आणि विरोधात कोण आहे हा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा बंडखोरांमुळे चांगलीच चर्चेत राहत आहे हे नक्की.

Intro:( फोटो आणि व्हिडिओ अगोदर पाठवायला विसरलो होतो त्याच्यामुळे नवीन अपलोड केले आहे)

राज्यात निवडणुकीच्या काळात पक्षांतराचे वारे, पैठण तालुक्यात अनेक नाराज कार्यकर्त्यांचे पक्षांतरBody:विधानसभेच्या निडणुकी आधी राज्यात अनेकांनी पक्षांतर केल्याचं पाहायला मिळालं. मात्र वरच्या पातळीवर नाही तर खालच्या पातळीवर देखील अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीत उमेदवारांची साथ सोडल्याच पाहायला मिळालं. स्थानिक राजकारण समोर ठेवून गावागावात आता पक्षातराचे वारे वाहताना ग्रामीणभागात दिसत आहे.


शहरापेक्षा ग्रामीण भागात सध्या उमेदवाराच्या प्रचार बैठका,सभातुन विकासाचा जाहीरनामा सक्षमपणे मतदारापुढे न माडतां विधानसभेचे उमेदवार एकमेकाचे उणे दुणे काढत असल्याचं दिसून येत. प्रत्येक गावात जणु काय विधानसभेच्या अनुशंगाने मनोरंजनाचाच कार्यक्रम सल्यासारखे वाटु लागल्याने, गटातटातील निष्ठावान लोक आता पक्ष बदलु लागले. नुकतंच झालेल्या आपेगाव येथील राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यक्रमात माजी सरपंच आशोक औटे,भरत औटे, सह बर्याच कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत धनुष्य सोडून घड्याळ हाती बांधल्याने यानंतर स्थानिक राजकारणात हि बदलाचे वारे दिसून आले. तर मौजे नांदर येथील कट्टर राष्ट्रवादि चे नेते रेवन कर्डीले व मच्छीद्र मिसाळसह अनेक कार्यकर्ते सह ठिकठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश होत असल्याने कार्यकर्त्याच्या ऐन वेळी होत असलेल्या खांदेपालपालटाच्या चर्चेला उधाण येत आहे.
Conclusion:कोणी पाण्याच्या मुद्द्यावर तर कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकमेकांवर आरोप करत पक्षांतर करत आहेत. त्यामुळे मतदारांना कोणता कार्यकर्ता कोणाचा प्रचार करतोय हे कळायला मार्ग नाही. अश्या परिस्थिती आता उमेदवारांना नेमकं आपल्या सोबत कोण आणि विरोधात कोणता कार्यकर्ता आहे हा संभ्रम देखील निर्माण होत असल्याने यावेळची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा बंडखोरांमुळे चांगलीच चर्चेत राहत आहे हे नक्की.
Last Updated : Oct 12, 2019, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.