ETV Bharat / state

Imtiyaz Jaleel Hunger Strike : नामांतराच्या विरोधात अखेर इम्तियाज जलील रस्त्यावर; आज बेमुदत साखळी उपोषण

author img

By

Published : Mar 4, 2023, 10:01 AM IST

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आज 4 मार्चपासून बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. त्याबाबतची घोषणा इम्तियाज जलील यांनी केली. फेसबुक लाईव्ह करून जलील यांनी माहिती दिली आहे. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याला त्यांनी विरोध केला आहे.

MIM MP Imtiyaz Jaleel
खासदार जलील

नामांतर विरोधात एमआयएम करणार आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिव करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध करत रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. आज 4 मार्चपासून बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा जलील यांनी केली. याबाबत फेसबुक लाईव्ह करून जलील यांनी माहिती दिली आहे.


शहराचे नाव औरंगाबादच असायला हवे : सरकराने आमच्या जिल्ह्याचे नाव बदलले आहे. मात्र अनेक नागरिकांना वाटत आहे की, शहराचे नाव औरंगाबादच असायला हवे. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचे श्रेय मिळाव म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती जलील यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंर्तगत केले जाणार नाही. तर औरंगाबाद नावाला पसंत करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने हे उपोषण केले जाणार असल्याचे जलील म्हणाले आहे.


एमआयएम विरोध करणारच : शहराच्या नामांतराच्या निर्णयाला कोणत्याच राजकीय पक्षाने विरोध केला नाही. अनेक राजकीय पक्षांनी समर्थन केले असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने देखील याचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना घेऊन आम्हाला रस्त्यावर यावे लागत आहे. कोणीही विरोध करत नसल्याने, आम्हाला जे वाटेल ते जनेतेला मान्य करावे लागेल असा समज सरकारचा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. त्यामुळे आंदोलनाला सुरूवात करत असून दिवस आणि रात्र बेमुदत असे हे उपोषण असणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.


बेमुदत उपोषण करणार : पोलिसांना आणि प्रशासनाला आमचे आवाहन आहे की, आमचे आंदोलन लोकशाही पद्धतीने आणि शांततेत असणार आहे. यापूर्वी आम्ही औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती तयार केली होती. त्याच कृती समितीच्या अंर्तगत हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ज्या पक्ष आणि संघटनांना आमच्यासोबत यायचं आहे, त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला तसे कळवावे. 4 मार्च पासून या उपोषणाला सुरवात होणार असून, ते किती दिवस चालेल याबाबत सांगता येणार नसल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.

हेही वाचा :Old Man Murdered: शेतातच प्रेमी जोडपे करत होते 'तसले' चाळे.. म्हाताऱ्याने गुपचूप काढले फोटो.. वादानंतर म्हाताऱ्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.