ETV Bharat / state

Aaditya Thackeray Criticizes BJP : माझा तुम्ही 'बाळ' असा उल्लेख केला याचा अभिमान; आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 9:23 PM IST

Aditya Thackeray Criticizes BJP: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या मुद्द्यावरून (Issue of Waghnakh) राजकारण चांगलेच तापले आहे. ही वाघनखे (Waghnakh) खरी की खोटी? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित (MLA Aditya Thackeray) केला होता. त्यानंतर भाजपाकडून (Shivaji Maharaj Waghnakh) बालबुद्धी अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. मात्र, त्याला प्रत्युत्तर देताना माझ्या नावासोबत बाळ लावले याचा मला अभिमान आहे. कारण हे नाव माझ्या आजोबांचे होते आणि ते माझ्या रक्तात आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेत्यांवर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केली. (Aditya Thackeray In Chhatrapati Sambhaji Nagar)

Aditya Thackeray Criticizes BJP
आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका

भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : Aaditya Thackeray Criticizes BJP : एका अधु बाळाने यांना 'सळो की पळो' करून सोडलं. आम्ही ओळखत असलेली ही भाजपा नाही. आम्ही वाजपेयींच्या आडवानांची भाजपा ओळखत होतो. मात्र आता ही वेगळीच भाजपा आहे. आम्ही आमची संस्कृती आणि पातळी सोडणार नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. वाघनखे आमच्यासाठी दैवत आहेत. मात्र ते आणताना कायमचे आणणार का? हा आमचा प्रश्न होता. जर ते कायमचे देशात आणणार असाल तर मंदिर करावं. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्यामुळे भाजपाला खर बोलावं लागलं आणि त्यांनी सुधारित जीआर काढला, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.


रागाने अंगावर येतात: भाजपा किती दिवस खोटं बोलणार, प्रश्न विचारल्यावर रागाने अंगावर येतात, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यातील मंत्र्यांच्या प्रदेश वाऱ्यांवर मी बोललो आहे. दोन, तीन परदेश वाऱ्या आमच्यामुळे रद्द झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर कलाकारांना बोलून फोटो काढायचे होते. मी ट्विट केल्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा देखील रद्द केला; मात्र त्याला अतिपावसाचे नाव दिले. आता उद्योग मंत्री दौरा करणार आहेत. त्यांनी उद्योगांवर बैठक घ्यावी. हरकत नाही; मात्र कोणासोबत बैठक आहे, किती गुंतवणूक येणार हे त्यांनी जनतेला सांगावं इतकीच अपेक्षा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नारायण राणे यांना आमच्यावर टीका करण्यासाठी पगार मिळतो. त्यांच्यावर काही बोलणार नाही, अशी मिश्किल टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली.

बछड्यांना भेटलो: 17 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ उद्यानातील वाघांच्या बछड्यांचे नाव आदित्य ऐवजी दुसरे ठेवण्यात आले होते. त्यावरून मोठे राजकारण झाले होते. आदित्य ठाकरे उद्यानात जाऊन पाहणी करत त्याच बछड्यांना आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. या ठिकाणी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आदित्य नाव आले. नंतर घाबरून दुसरे नाव दिले. मला त्या बछड्यांना भेटायला यायचे होते आणि 'जय महाराष्ट्र' बोलायचे होते. नाव बदलण्याची एवढी भीती कशाला? हे त्यांना विचारायला पाहिजे. मी बछड्यांना फक्त आत जाऊन 'जय महाराष्ट्र' बोलून आलो अशी मिश्किल टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा:

  1. Aaditya Thackeray On BJP : घटनाबाह्य सरकारमध्ये इंपोर्ट केलेल्यांचीच चलती, आदित्य ठाकरेंचा युती सरकारवर हल्लाबोल
  2. MU Senate Election : सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  3. Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray : बाप आजारी असताना सरकारी पैशावर परदेशात मजा मारणार्‍याने शहाणपण शिकवू नये - आशिष शेलार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.