ETV Bharat / state

Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray : बाप आजारी असताना सरकारी पैशावर परदेशात मजा मारणार्‍याने शहाणपण शिकवू नये - आशिष शेलार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 7:46 PM IST

Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शिंदे फडणवीस सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (Deputy CM Devendra Fadnavis) आणि इतर मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून हल्लाबोल केला. तर त्याला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बाप आजारी असताना सरकारी पैशावर परदेशात मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवू नये, असा खोचक टोला त्यांनी लगावला. (Aditya Thackeray)

Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray
आशिष शेलार

आशिष शेलार हे आदित्य ठाकरेंवर टीका करताना

मुंबई Ashish Shelar Criticizes Aditya Thackeray : भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, शाळेतील बडबड गीते सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, अशी म्हणण्याची ज्यावेळी बालबुद्धी आणि वय असतं त्या व्यक्तीने राजकारणावर सरकारला प्रश्न केले आहेत. त्यानंतर जे होतं ते आदित्य ठाकरे तुमचं झालं आहे असा शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. स्वतःचा गृहपाठ केलाच नाही मात्र ज्यांना पाठ करायला दिला त्यांनी योग्य सल्ला दिला नसल्यामुळे तुमची अडचण झाली आहे. जपान सरकारनं स्वखर्चाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा दिवसांच्या जपान दौऱ्यावर बोलवलं होतं. राज्य सरकारचा एकही रुपया खर्च न होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौरा यशस्वी केला आहे. त्यांनी आपल्या देशात आणि राज्यात नवीन तंत्रज्ञान, नवीन नोकऱ्यांची, संधी, नवीन रोजगारासाठीच्या टेक्नॉलॉजी आणि व्यवसाय कंपन्यांसोबत यशस्वीरित्या चर्चा केली.

नंतर फडणवीसांना प्रश्न विचारा : मुंबई शहर आणि उपनगरासाठी भविष्यासाठी जे आवश्यक होतं ते उपमुख्यमंत्री फडणीस यांनी आणलं आहे. वर्षानुवर्षे मुंबईत पडणारा पाऊस आणि तुंबणारी मुंबई यातून मुक्ती मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान या दौऱ्यात चर्चा होऊन निर्णय होत आहे. मुंबई आणि उपनगरातील नागरिकांच्या दळवणाच्या सोयीसाठी मेट्रोचं जाळं वाढावं यासाठी दौऱ्यात आश्वासन मिळतं. म्हणून तुमच्या पोटात दुखत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंवर आशिष शेलार यांनी केला आहे. गृहपाठ पूर्ण करा, अभ्यास करा आणि नक्की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना प्रश्न विचारण्याची भूमिका घ्या. तोपर्यंत गृहपाठ करा, असा सल्ला आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.



आशिष शेलारांचे ट्विट : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन परदेश दौऱ्यावरून महायुती सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर लगेचच सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रियांना सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी तर जपान सरकारकडून दौऱ्या संदर्भात देण्यात आलेलं निमंत्रण पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

फडणवीसांचा संपूर्ण खर्च जपानने केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला. कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. जेव्हा अतिथी म्हणून निमंत्रण दिलं जातं त्यावेळेस निमंत्रण देणारा देश म्हणजेच जपान सरकारने सर्व खर्च केला आहे. फक्त उपमुख्यमंत्र्यांसोबत जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा खर्च सरकारने केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौऱ्यात कोणती कार्ये केली आणि गुंतवणूक आणली या संदर्भात सर्वच समाज माध्यमांवर माहिती उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्‍यामुळे आली आहे. बाप आजारी असताना सरकारी पैशावर मजा करणाऱ्याने दुसऱ्याला शहाणपणा शिकवायचे नसल्याचे म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांना बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका असंही सल्ला दिला आहे.

हेही वाचा:

  1. Chhagan Bhujbal On Ajit Pawar Dispute : हो मी अजित पवारांशी मोठ्या आवाजात बोललो; मात्र... छगन भुजबळांनी सांगितलं खरं कारण
  2. Fadnavis On Maratha Reservation : मराठा, ओबीसी समाजात भांडणे लावण्याची सरकारची भूमिका नाही; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
  3. Jayant Patil On NCP MLA: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच आमदार आमच्या संपर्कात - जयंत पाटील
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.