ETV Bharat / state

Ashtamasidhi well in Amravati : अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्यात औषधी गुण, लहान बाळांच्या आंघोळीसाठी उसळते गर्दी

author img

By

Published : Aug 5, 2022, 10:20 AM IST

अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात असणारी श्री क्षेत्र अष्टमासिद्धी येथील विहीरीचा ( Ashtamasidhi well water ) नावलौकीक राज्यभर पसरला आहे. तिथल्या पाण्यात विषेश गुणकारी घटक ( medicinal properties in Ashtmasiddhi well water ) आढळतात. त्यामुळे या ठिकाणी विदर्भातील विविध भागातून अनेक जण लहान बाळांना घेऊन आंघोळीसाठी येतात. मंगळवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते.

ashtamasidihi
विहिरीच्या पाण्यात औषधी गुण

अमरावती - अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात ( Achalpur taluka Amravati ) असणारी श्री क्षेत्र अष्टमासिद्धी येथील आकाराने लहान असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने ( Ashtamasidhi well water ) लहान बाळांची आंघोळ घातली तर अनेक आजार बाळांना होत नाहीत अशी मान्यता आहे. यामुळेच या विहिरीवर लहान बाळांची आंघोळ करण्यासाठी नेहमीच गर्दी असते. लहान मुलांसोबतच प्रत्येकांनी या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केली तर ते आरोग्यासाठी पोषक ( Bathing babies good for health )असल्यामुळे केवळ अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील अनेक कुटुंबाची या विहिरीच्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी नेहमीच गर्दी ( crowd to bath at Ashtamasidhi well ) पाहायला मिळते.

विहिरीच्या पाण्यात औषधी गुण

मंगळवारी आणि शुक्रवारी आंघोळीचे महत्व - अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांना लागूनच असलेल्या अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे लहान बाळांना त्वचारोग होत नाही ( Well water prevents skin diseases ). या ठिकाणी विदर्भातील विविध भागातून अनेक जण लहान बाळांना घेऊन आंघोळीसाठी येतात. मंगळवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. या दोन दिवशी या विहिरीतील पाण्याने आंघोळ केल्याने अधिक फायदा होतो अशी धारणा असल्यामुळे मंगळवारी आणि शुक्रवारी अष्टमासिद्धी येथे सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते.

अशी आहे प्रथा - अष्टमासिद्धी येथे येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोर आणि बकेट अल्प दरात भाड्याने उपलब्ध करून दिली जाते. लहान बाळांना आंघोळ करण्यासाठी विहिरीतून पहिल्यांदाच पाणी काढताना बकेटीमध्ये विड्याचे पान ठेवून त्यावर कापूर जाळण्यात येतो आणि कापूर जळत असताना ही बकेट दोराच्या साह्याने विहिरीच्या पाण्यात सोडली जाते. यानंतर या बकेटीत येणारे पाणीवर काढून हे पाणी लहान बाळांच्या अंगावर ओतले जाते. ही प्रथा या ठिकाणी अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे.

नवस म्हणून वाहल्या जातो भोपळा - जे लहान बाळ नेहमी चिडचिड करत आणि आजारी राहतो अशा बाळांसाठी या ठिकाणी नवस बोलला जातो ( Vows for babies ). नवस म्हणून या ठिकाणी भोपळा वाहल्या जातो. भोपळा वाहल्यामुळे आपले बाळ देखील भोपळ्यासारखे टुणटुनीत राहतो असा समज अनेक भाविकांचा असल्यामुळे या ठिकाणी भोपळा वाहण्याची प्रथा रूढ झाली आहे.

महानुभाव पंथीयांचे आहे तीर्थस्थळ - अष्टमहासिद्धी अर्थात अष्टमासिद्धी हे महानुभाव पंथीयांचे तीर्थस्थळ ( Ashtmasiddhi is pilgrimage site of Mahanabhava Panthiya )आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांचे मंदिर आहे. या ठिकाणी हे दोन्ही महात्मे तीन दिवस मुक्कामी असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी आणि शुक्रवारी महानुभाव पंथीय भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येत असल्यामुळे या मंदिर परिसरात असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी सुद्धा बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसांना महत्त्व देण्यात आले आहे.

या कारणामुळे विहिरीच्या पाण्यात आहेत औषधी गुण - अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्यामध्ये औषधी गुण असल्यामुळे ( medicinal properties in Ashtmasiddhi well water ) या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेची संबंधित विकार होत नाही. भौगोलिकदृष्टीने विचार केला तर अष्टमासिद्धी ची विहीर ज्या ठिकाणी आहे तो संपूर्ण दख्खनचा पठार असून याची निर्मिती लावारसाच्या उद्रेकामुळे झाली आहे. लावारसाचा उद्रेक होताना त्यामधून अनेक वायू सुद्धा बाहेर पडलेत. यापैकीच सल्फर अर्थात गंधक या वायूचा प्रवाह जमिनीतून अष्टमासिद्धी येथील विहिरीत आला आहे. या विहिरीतील पाण्यात गंधकाचे मिश्रण सतत होत असल्यामुळे या पाण्याचा रंग पिवळसर झाला असून हे पाणी सतत गरम असतं. अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्याचा उपसा सतत सुरू असल्यामुळे हे पाणी आता फारसे गरम नसले तरी गंधकयुक्त असणार हे पाणी त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. बालरोगांसाठी देखील या विहिरीचे पाणी उपयुक्त आहे अशी माहिती भूगोल विषयाच्या अभ्यासक प्रा. डॉ. शुभांगी देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या औषधीयुक्त पाण्याबाबत संशोधन होणे गरजेचे असल्याचे देखील प्रा. डॉ. शुभांगी देशमुख म्हणाल्या.

हेही वाचा - Grenade Attack in Pulwama : पुलवामा येथे ग्रेनेड हल्ल्यात बिहारचा मजूर ठार, नायब राज्यपालांनी भ्याड हल्ल्याचा केला निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.