ETV Bharat / state

'कस्तुरबा' म्हणजे महात्मा गांधींची खरी शक्ती आणि प्रेरणा- तुषार गांधी

author img

By

Published : Jul 8, 2019, 3:10 AM IST

Updated : Jul 8, 2019, 5:34 AM IST

'कस्तुरबा' म्हणजे महात्मा गांधींची खरी शक्ती आणि प्रेरणा- तुषार गांधी

कस्तुरबा' यांचे महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील योगदान आणि त्यांच्या देशसेवेबाबत तुषार गांधी यांच्याकडून जाणून घेण्यासाठी अमरावतीकरांनी सभागृहात खच्चून गर्दी केली होती. 'आम्ही सारे'चे अविनाश दुधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडल्यावर तुषार गांधी यांनी कस्तुरबा यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला.

अमरावती - राष्ट्रपिता महात्मा गांधी आज संपूर्ण जगात आदरणीय आहेत. त्यांनी आयुष्यात मोहमदास गांधींनी महात्मा गांधी आणि पुढे भारताचे राष्ट्रपिता होण्याचा जो काही पल्ला गाठला, त्यामाघे शक्ती आणि खरी प्रेरणा या कस्तुरबा होत्या. असे महात्मा गांधींचे पंतू आणि महात्मा गांधी फाउंडेशनचे विश्वस्त तुषार गांधी यांनी अमरावतीत आयोजित 'कस्तुरबा' व्याख्यानात स्पष्ट केले. अमरावतीतील श्रीमती विमालाबाई देशमुख सभागृहात 'आम्ही सारे' फाउंडेशनच्यावतीने 'कस्तुरबा' या विषयावर आयोजित करण्यात आले होते.

'कस्तुरबा' म्हणजे महात्मा गांधींची खरी शक्ती आणि प्रेरणा- तुषार गांधी

कस्तुरबा' यांचे महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील योगदान आणि त्यांच्या देशसेवेबाबत तुषार गांधी यांच्याकडून जाणून घेण्यासाठी अमरावतीकरांनी सभागृहात खच्चून गर्दी केली होती. असमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी कर्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 'आम्ही सारे'चे अविनाश दुधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडल्यावर तुषार गांधी यांनी कस्तुरबा यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला.

वैयक्तिक वयक्तिक आयुष्यात अनेक संकटे, हालअपेष्टा, चढउत्तरांचा सामना करताना कस्तुरबा या महात्मा गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. गांधींजींना शिक्षणासाठी आंदोलनासाठी प्रोत्साहित करणाऱ्या त्या कणखर महिला होत्या. शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा हट्ट गांधीजींनी केला तेव्हा घराची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. मात्र, आपले दागिने देऊन कस्तुरबा यांनी गांधीजींना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. दक्षिण आफ्रिकेत आपल्या तीन मुलांसह कस्तुरबा गांधीजींबरोबर गेल्या तेव्हा त्यांना लहानपणी अनेक गोष्टींना घाबरणार नवरा आता काहीतरी वेगळा झाला आहे याची जाणीव झाली. हिंदू पद्धतीच्या लग्नाला दक्षिण आफ्रिकेत मान्यता नाही आता धर्म बदलून पुन्हा लग्न करावे लागेल हे कळताच कस्तुरबांनी आंदोलनाची भूमिका घेतली. यामुळे कस्तुरबांना दक्षिण आफ्रिकेत कारागृहात जावे लागले होते. आजारपणी आपला धर्म कधीही बाटवला जाणार नाही याचे वचन कस्तुरबांनी गांधीजींकडून घेतले होते. यामुळेच प्राण्यांपासून तयार होणारे औषध, इंग्जक्शन त्यांनी कधीही घेतले नाही. गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनात, मिठाच्या सत्याग्रहात कस्तुरबा यांचा मोलाचा वाटा होता. सेवाग्राम आश्रम येथेही कस्तुरबा बापूंच्या सोबत होत्या.

कस्तुरबा गांधी आजारी असताना इंग्रजांनी दक्षिण आफ्रिकेत कारागृहात असणाऱ्या गांधीजींना आपल्या आंदोलनाची भूमिका माघे घ्याल तरच तुमची सुटका करू अशी अट घातली आणि सुटकेसाठी विनंतीपत्र लिहिण्यास सांगितले. गांधीजींनी विनंती पत्र न लिहिता कस्तुरबा याना पत्र लीहून तू गेली तरी हरकत नाही. मात्र, मी आंदोलन सुरूच ठेवणार असे कळविले. हे पत्र पुत्र हरिकलाल गांधी यांनी आई कस्तुरबाला वाचून सांगितले. या पत्रामुळे हरीलालच्या मनात गंधीजींबद्दल द्वेष निर्माण झाला. एकीकडे पती आणि दुसऱ्या बाजूला मुलगा आशा पेचात अडकलेल्या कस्तुरबावर एकेदिवशी मुलगा हरिलाल ने मुस्लिम धर्म स्विकारला या वृत्ताने संकट कोसळले. मात्र न खचता कस्तुरबांनी गांधीजींसोबत राष्ट्र कार्य सुरू ठेवले. गांधीजी हरीलालला शिक्षा वगैरे देण्याच्या भांडगडीत न पडता त्याच्याजवळून त्याची मुलगी आणि दोन मुलांना सेवाग्राम आश्रम मध्ये आणून शिकवले. हे सर्व करत असताना कधी गांधींनी कारागृहात तर कधी कस्तुरबा कारागृहात असे या दाम्पत्याचे आयुष्य होते असे तुषार गांधी म्हणाले.

इंग्रजांनी कस्तुरबांना अखेरच्या काळात मुद्दाम पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये गांधीजींबरोबर ठेवले असे आरोप केले जातात. या आरोपाचे खंडन करताना तुषार गांधी म्हणाले गांधीजींना तीन ते चार कार्यकर्त्यांसह इंग्रजांनी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आंधरकोठडीत डांबले होते. काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू होती. आशा परिस्थितीत मुंबईत शिवाजी पार्कवर कोण नेता भाषण करेल असा प्रश्न निर्माण झाला असता कस्तुरबांनी शिवाजी पार्कवर लोक समुदायाला संबोधित केले. भाषण संपताच इंग्रजांनी कस्तुरबांना अटक करून भायखळ्याच्या कारागृहात ठेवले. तिथे कस्तुरबांची प्रकृती खालावल्याने त्यांचे काही बरे वाईट झाले तर लोक भडकतील या भीतीने इंग्रजांनी कस्तुरबांना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये ठेवले. याठिकाणी राष्ट्र सेवेला समर्पित कातूरबांचे आयुष्य थांबले. कस्तुरबा या देशासाठी शहीद झाल्यात. मात्र, त्यांचे हे बलिदान कोणी मान्य केले नसल्याची खंत अतिशय भावुक होऊन तुषार गांधी यांनी व्यक्त केली.

Intro:राष्ट्रपिता महात्मा गांधी आज संपूर्ण जगात आदरणीय आहेत. आयुषयच्या सुरुवातीच्या काळात भेखाड असणाऱ्या मोहमदास गांधींनी महात्मा गांधी आणि पुढे भारताचे राष्ट्रपिता होण्याचा जो काही पल्ला गाठला त्या माघे त्यांची खरी शक्ती आणि खरी प्रेरणा या कस्तुरबा होत्या असे महात्मा गांधींचे पंतू आणि महात्मा गांधी फाउंडेशनचे विश्वस्त तुषार गांधी यांनी अमरावतीत श्रीमती विमालाबाई देशमुख सभागृहात 'आम्ही सारे' फाउंडेशनच्यावतीने आयोजित ' कस्तुरबा' या विषयावर आयोजित व्यखतानात स्पष्ट केले.


Body:'कस्तुरबा' यांचे महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील योगदान आणि त्यांच्या देशसेवेबाबत तुषार गांधी यांच्याकडून जाणून घेण्यासाठी अनरावतीकरांनी सभागृहात खच्चून गर्दी केली होती. असमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी कर्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 'आम्ही सारे'चे अविनाश दुधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडल्यावर तुषार गांधी यांनी कस्तुरबा यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला.
वैयक्तिक वयक्तिक आयुष्यात अनेक संकटे, हालअपेष्टा, चढउत्तरांचा सामना करताना कस्तुरबा या महात्मा गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. गांधींजींना शिक्षणासाठी आंदोलनासाठी प्रोत्साहित करणाऱ्या त्या कणखर महिला होत्या. शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा हट्ट गांधीजींनी केला तेव्हा घराची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. मात्र आपले दागिने देऊन कस्तुरबा यांनी गांधीजींना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं. दक्षिण आफ्रिकेत आपल्या तीन मुलांसह कस्तुरबा गांधीजींबरोबर गेल्या तेव्हा त्यांना लहानपणी अनेक गोष्टींना घाबरणार नवरा आता काहीतरी वेगळा झाला आहे याची जाणीव झाली. हिंदू पद्धतीच्या लग्नाला दक्षिण आफ्रिकेत मान्यता नाही आता धर्म बदलून पुन्हा लग्न करावे लागेल हे कळताच कस्तुरबाने आंदोलनाची भूमिका घेतली. यामुळे कस्तुरबांना दक्षिण आफ्रिकेत कारागृहात जावे लागले होते.आजारपणी आपला धर्म कधीही बाटवला जाणार नाही याचे वचन कस्तुरबांनी गांधीजींकडून घेतले होते. यामुळेच प्राण्यांपासून तयार होणारे औषध, इंग्जक्शन त्यांनी कधीही घेतले नाही.
गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनात, मिठाच्या सत्याग्रहात कस्तुरबा यांचा मोलाचा वाटा होता. सेवाग्राम आश्रम येथेही कस्तुरबा बापूंच्या सोबत होत्या.
कस्तुरबा गांधी आजारी असताना इंग्रजांनी दक्षिण आफ्रिकेत कारागृहात असणाऱ्या गांधीजींना आपल्या आंदोलनाची भूमिका माघे घ्याल तर तुमची सुटका करू अशी अट घातली आणि सुटकेसाठी विनंतीपत्र लिहिण्यास सांगितले.गांधीजींनी विनंती पत्र न लिहिता कस्तुरबा याना पत्र लुहून तू गेली तरी हरकत नाही मात्र मी आंदोलन सुरूच ठेवणार असे कळविले. हे पत्र पुत्र हरिकलाल गांधी यांनी आई कस्तुरबाला वाचून सांगितले. या पत्रामुळे हरीलालच्या मनात गंधीजींबद्दल द्वेष निर्माण झाला. एकीकडे पती आणि दुसऱ्या बाजूला मुलगा आशा पेचात अडकलेल्या कस्तुरबावर एकेदिवशी मुलगा हरिलाल ने मुस्लिम धर्म स्विकारला या वृत्ताने संकट कोसळले. मात्र न खचता कस्तुरबांनी गांधीजींसोबत राष्ट्र कार्य सुरू ठेवले. गांधीजींनी हरीलालाला शिक्षा वगैरे देण्याच्या भांडगडीत न पडता त्याच्याजवळून त्याची मुलगी आणि दोन मुलांना सेवाग्राम आश्रम मध्ये आणून सशिकवला. हे सर्व करित असताना कधी गांधींनी कारागृहात तर कधी कस्तुरबा कारागृहात असे या दाम्पत्याचे आयुष्य होते असे तुषार गांधी म्हणाले.
इंग्रजांनी कस्तुरबांना अखेरच्या काळात मुद्दाम पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये गांधीजींबरोबर ठेवले असे आरोप केले जातात. या आरोपाचे खंडन करताना तुषार गांधी म्हणाले गांधीजींना तीन ते चार कार्यकर्त्यांसह इंग्रजांनी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आंधरकोथंडीत डांबले होते. काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू होती. आशा परिस्थितीत मुंबईत शिवाजी पार्कवर कोण नेता भाषण करेल असा प्रश्न निर्माण झाला असता कस्तुरबांनी शिवाजी पार्कवर लोक समुदायाला संबोधित केले. भाषण संपताच इंग्रजांनी कस्तुरबांना अटक करून भायखळ्याच्या कारागृहात ठेवले. तिथे कडतुरबांची प्रकृती खालावल्याने त्यांचे काही बरे वाईट झाले तर लोक भडकतील या भीतीने इंग्रजांनी कस्तुरबांना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये ठेवले. याठिकाणी राष्ट्र सेवेला समर्पित कातूरबांचे आयुष्य थांबले. कस्तुरबा या देशासाठी शहीद झाल्यात मात्र त्यांचे हे बलिदान कोणी मान्य केले नसल्याची खंत अतिशय भावुक होऊन तुषार गांधी यांनी व्यक्त केली.


Conclusion:
Last Updated :Jul 8, 2019, 5:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.