ETV Bharat / state

'शिवशाही'तून चांदीची वाहतूक, चालकाने बस नेली पोलीस ठाण्यात

author img

By

Published : Jan 2, 2021, 5:51 PM IST

पुण्यावरून नागपूरला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून संशयितपणे चांदीची वाहतूक केली जात होती. हा प्रकार लक्षात येताच, चालक व वाहकाने ही बस थेट पोलीस आयुक्तालयामध्ये आणली. त्यानंतर या बसला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.

'शिवशाही'तून चांदीची वाहतूक, चालकाने बस नेली पोलीस ठाण्यात
'शिवशाही'तून चांदीची वाहतूक, चालकाने बस नेली पोलीस ठाण्यात

अमरावती - पुण्यावरून नागपूरला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून संशयितपणे चांदीची वाहतूक केली जात होती. हा प्रकार लक्षात येताच, चालक व वाहकाने ही बस थेट पोलीस आयुक्तालयामध्ये आणली. त्यानंतर या बसला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.

प्रवासी बदलले पार्सल कायम

पुणे मध्यवर्ती बस स्थानकावरून शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता नागपूरसाठी शिवशाही बस निघाली. या बसमध्ये दोन चालक आणि दोन वाहकांसह 35 प्रवासी होते. त्यातील एका प्रवाशाकडे एक सुटकेस, एक प्लास्टिकचे पोते आणि एक पुष्ठ्याचे खोके होते. हा प्रवासी सकाळी 8.30 वाजता अकोल्याला उतरला. मात्र त्याच्यासोबत असणारे पार्सल त्याने आपल्या सोबत उतरवले नाही, त्याच्या जागेवर दुसरी व्यक्ती बसली. ती व्यक्ती सकाळी 11:30 वाजता अमरावती बस स्थानकावर उतरली, त्याने देखील या वस्तू तशाच बसमध्ये ठेवल्या. त्यानंतर पुन्हा अजून एक व्यक्ती अमरावती बसस्थानकामधून या बसमध्ये बसला. मात्र वाहकाला या वस्तूंचा संशय आल्याने त्याने याची माहिती चालकाला दिली. चालकाने ते खोके फोडून पाहिले असता, त्यामध्ये चांदी असल्याचे आढळून आले. यानंतर चालकाने बस थेट अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये आणली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी ही बस फ्रेजारपुरा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली आहे.

'शिवशाही'तून चांदीची वाहतूक, चालकाने बस नेली पोलीस ठाण्यात

घटनेची चौकशी सुरू

चांदीची संशयास्पदरित्या वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा माल आमच्या मालकाचा असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले असून, कुरियरद्वारे असा माल आपण नियमित नेत असतो आपल्याकडे परिवहन महामंडळाचा पास देखील असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. दरम्यान पोलिसांनी चांदी मोजण्यासाठी दागिने व्यवसायिकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.