ETV Bharat / state

'नाळ'च्या चैत्याची सैराट फेम रिंकूसोबत लंडनमध्ये धम्माल मस्ती, पाहा व्हिडीओ

author img

By

Published : Oct 21, 2020, 10:29 AM IST

रिंकू राजगुरू आणि चैत्या या दोघांचा लंडनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चैत्या आणि रिंकू हे कधी क्रिकेट तर कधी लंडनमधील प्रसिद्ध अशा थेम्स नदी काठी निवांत वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहेत.

Rinku Rajguru fun with naal movie child actor Chaitya in London
'नाळ'च्या चैत्याची सैराट फेम रिंकूसोबत लंडनमध्ये धम्माल मस्ती, पाहा व्हिडीओ

अमरावती - नाळ या मराठी चित्रपटात खास भूमिका साकारत महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पोहोचलेला अमरावती मधील बाल कलाकार चैत्या उर्फ श्रीनीवास पोकळे हा 'मेडली पार्ट-२' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही दिवसापूर्वी लंडनमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू याच्यासोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान, या दोघांचाही लंडनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चैत्या आणि रिंकू हे कधी क्रिकेट तर कधी लंडनमधील प्रसिद्ध अशा थेम्स नदी काठी निवांत वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहेत.

रिंकू-चैत्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ...
नाळ चित्रपटात केलेल्या उत्कृष्ट भूमिकेसाठी चैत्याला 'उत्कृष्ट बाल कलाकार' हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याने तेलुगू भाषेतील 'जॉर्ज रेड्डी' या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका निभावली. आता मेडली या चित्रपटात चैत्या अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू देखील आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे.

आधीपासूनच मस्तीखोर असलेला चैत्या लंडनमध्ये देखील मस्ती करताना दिसत आहे. लंडनमधील हिथ्रो एअर पोर्टपासून 15 मिनिटांच्या अंतरावर थेम्स नदीच्या किनारी या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - पिंगळा देवीवर हिंदू-मुस्लीम भाविकांची श्रद्धा ; मशिदीसारखा मंदिराचा घुमट

हेही वाचा - मेळघाटात आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार; भाजपा करणार ठिय्या आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.