ETV Bharat / state

सायबर गुन्ह्यांना बसणार आळा, अमरावतीच्या सायबर क्राईम विभागाकडून गावोगावी जनजागृती

author img

By

Published : Aug 25, 2021, 11:05 AM IST

Updated : Aug 25, 2021, 12:46 PM IST

नागरिकांची बँक खाते बंद केल जाईल, कार्ड बंद होईल, अशी बतावणी करणारा फोन कोणाला आल्यास किंवा एखादी लिंक पाठवून नागरिकांची महत्वाची माहिती घेऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे आपला एटीएम पिन किंवा मोबाईल ओटीपी कोणाला देऊ नये, अशा अनेक बाबींची माहिती देण्यात येत आहे.

सायबर गुन्ह्यांना बसणार आळा,
सायबर गुन्ह्यांना बसणार आळा,

अमरावती -कोरोना काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासनाच्या वतीने बँकिंगसेवेचे डिजिटलायजेशन झाले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून बँकिंग व्यवहार ऑनलाइन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, या बरोबरच सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. या बाबींच्या अनुषंगाने ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. लोकांची ऑनलाइन फसवणूक होऊ नये याकरिता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांना बसणार आळा
अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात सायबर क्राईम बद्दल जनजागृती करणारी गाडी दाखल होत आहे. एका चित्रफितीच्या माध्यमातून सायबर गुन्हे आणि पासून आपण सुरक्षित कसे राहू शकतो, यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. नागरिकांची बँक खाते बंद केल जाईल, कार्ड बंद होईल, अशी बतावणी करणारा फोन कोणाला आल्यास किंवा एखादी लिंक पाठवून नागरिकांची महत्वाची माहिती घेऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे आपला एटीएम पिन किंवा मोबाईल ओटीपी कोणाला देऊ नये, अशा अनेक बाबींची माहिती देण्यात येत आहे. या संदर्भात सायबर क्राईम विभागाकडून जनजागृती करण्यासाठी चित्रफितीचा देखील वापर करण्यात येत आहे.
सायबर गुन्ह्यांना बसणार आळा,
सायबर गुन्ह्यांना बसणार आळा,

दरम्यान सायबर क्राईम सेलचे हे वाहन गावागावात जाऊन गावातील चौकात उभे केले जाते. यावेळी नागरिकही पोलिसांच्या या जनजागृती ला चांगला प्रतिसाद येत असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळच्या वेळी गावच्या मोठ्या चौकात, बस स्थानकाजवळ, पाराजवळ हे वाहन उभे केले जाते आणि सायबर गुन्हेगारीसंदर्भात नागरिकांना सतर्क करत जनजागृती करण्याचे काम सध्या सायबर विभागाकडून सुरू आहे.

Last Updated : Aug 25, 2021, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.