ETV Bharat / state

निवडणूक आयोग मनमानी करत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 10:39 PM IST

Prakash Ambedkar: निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. जोपर्यंत निवडणूक आयोगाचा दर्जा स्वायत्त राहील, तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष होतील. (Election Commission) यापूर्वी निवडणूक आयोगाने दिड दोन महिन्यांत निवडणुका घेतल्या होत्या; (Vanchit Bahujan Aghadi) परंतु आता निवडणूक आयोग मनमानी करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना

अमरावती Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणूक आयोग हा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. पहिली म्हणजे सार्वत्रिक निवडणुका घेणं आणि दुसरे म्हणजे, (General Elections) लोकप्रतिनिधीच्या मृत्यूमुळे किंवा इतर कोणत्याही कारणानं कोणत्याही मतदारसंघात जागा रिक्त असेल, तर त्या रिक्त जागेवर ६ महिन्यांच्या आत निवडणूक घेणं हे निवडणूक आयोगाचं मुख्य काम आहे. या कायदेशीर तरतुदी आहेत. यापूर्वी निवडणूक आयोगानं दिड दोन महिन्यांत निवडणुका घेतल्या होत्या.

म्हणे मणिपूर हिंसाचारामुळे निवडणुका नाही: निवडणुका घेणं ही एकमेव ड्युटी निवडणूक आयोगाची असतानासुद्धा ते निवडणूक वेळेवर घेत नाहीत. निवडणुका वेळेवर का घेतल्या जात नाहीत यासंदर्भात न्यायालयानेसुद्धा विचारणा केली आहे. मनिपूर मधील हिंसाचारामुळं निवडणुका घेता आल्या नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं न्यायालयाला दिलं.

तरीही निवडणुका पुढे ढकलता येत नाही: नॉर्थ-ईस्ट मधली परिस्थिती हाताबाहेर आहे, हे मान्य आहे; परंतु या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाला कुठलाही अधिकार नाही. निवडणुका जाहीर झाल्या आणि अचानकपणे युद्ध स्थिती उद्‌भवली तरीही निवडणुका पुढे ढकलता येत नाही, अशी स्थिती आहे. एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर ते चक्र पूर्ण करावं लागतं.


आमच्यासाठी 'इंडिया' आघाडीचे दार बंद: मागील आठवड्यात वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'इंडिया' आघाडीत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच 1 जानेवारी, 2023 रोजी त्यांनी भीमा कोरेगाव इथं सध्यातरी आमच्यासाठी 'इंडिया' आघाडीचे दार बंद असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर: यावेळी प्रकाश आंबेडकर यांना नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सत्तेत येणं, संविधान वाचवणं, तसंच राज्याची शांतता हा आमचा यावर्षीचा संकल्प असणार आहे. राज्याच्या बाहेर प्रकल्प जात आहेत. याबाबत आंबेडकरांना विचारलं असता ते म्हणाले की, या देशाच्या पंतप्रधान यांनी गेल्या 10 वर्षांत देशाला पोकळं केलं आहे. याचा एक आराखडा मांडण्यात येणार आहे.

इंडिया आघाडी'त सहभागी होण्याची 'वंचित'ची इच्छा: मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं होतं. याद्वारे त्यांनी पुन्हा एकदा 'वंचित बहुजन आघाडी'ची 'इंडिया आघाडी'त सहभागी होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान मोदींना हरवणं हेच आपलं एकमेव उद्दिष्ट असल्याचं पत्रात म्हटलं होतं. आंबेडकरांनी जागावाटपाचा एक फॉर्म्युला त्या पत्रात सुचवला होता. हा फॉर्म्युलावर X (पूर्वीचं ट्विटर) जाहीरही करुन टाकला.

हेही वाचा:

  1. ईडी प्रकरणावरुन रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा; काका म्हणाले, 'पुतण्या अजून बच्चा'
  2. वाटलं होतं आंधळी झाले, पण राम मंदिरामुळं डोळ्याचं पारणं फिटलं; 96 वर्षीय शालिनीताईंचा अनुभव
  3. 'सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींपेक्षा शिंदे समितीच्या सदस्यांना अधिक वेतन'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.